पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९२) वर सांगितलेल्या जेसूईट लोकांच्या मठाच्या काहींसें पलीकडे 'फ्रान्सिसकन चर्च आफ इनव्होकेशन आफ सांटो आंटोनियो' नावाचे एक ख्रिस्ती देवालय आहे. हे देवालय वसई येथे जी ख्रिस्ती देवालये आहेत, त्या सर्वांत अतिशय मोठे असून फार जुने आहे. मुख्य गाभान्याचे छत मेहराबदार असून त्याचे सुंदर कंगोरे अद्यापि कायम आहेत. बाप्तिस्मा देण्याचे पाणी जेथे ठेवति असत, त्याच्याजवळ एक मोठी कमान आहे ती, व चौकाच्या चारही बाजूंस ज्या कोठड्या आहेत त्यांच्या सभोवार जो बोळ आहे तो, हे दोन्ही भाग अद्यापि फार चांगल्या स्थितीत आहेत. ह्या देवालयाचे बांधकाम घडीव दगडांनी केलेले आहे. तसेच त्याचा एक जिना, कांहीं खिडक्या, व दरवाज्यांच्या चौकटी अद्यापि कायम आहेत. आंटोनियो डी पोर्टो नावांच्या एका ख्रिस्ती धर्मोपदेशकानें इ० स० १५३० ते ४० या कालांत वसई व साष्टी या दोन ठिकाणी पुष्कळ देवालये स्थापन केली. त्या सर्वांत वर सांगितलेले देवालय मुख्य होतें. इ० स० १५५० च्या सुमारास जेसूईट पंथाचे लोक प्रथमतः वसई येथे आले. त्या वेळी फ्रान्सिसकन लोकांचे आपसांत तंटे माजल्यामुळे त्यांचे महत्त्व कमी झाले होते. या देवालयांत पुष्कळ थडगी आहेत. त्यांपैकी एकावर “महाराजांचा मंत्रीःहा तारीख २४ आगष्ट इ० स० १८५८ रोजी मरण पावला. तो, त्याची पत्नी डोना लुईसा डा सिलव्हा, व त्याचे वंशज यांना या ठिकाणी पुरले आहे," असा पोर्तुगीज भाषेत लिहिलेला लेख आहे. याशिवाय दुसऱ्या पुष्कळ