पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५१) इमारतींतून कोठेच दृष्टीस पडत नाही. या मठाला लागूनच पूर्वीची जेसूईट लोकांची पाठशालेची इमारत आहे. या पाठशालेच्या भिंती अद्यापि फार मजबूत आहेत, परंतु हल्ली त्या वेली व इतर झाडेझुडपे यांनी आच्छादून गेल्या आहेत. जेसूईट लोकांच्या मठाचा पाया सेंट झेवियर याचा मालचियर गॉन सालवेस म्हणून एक परम स्नेही होता त्याने इ० स० १९४८ त म्हणजे जेसूईट लोक वसई येथे येण्याचे आदले वर्षों घातला. इ० स० १६७३ पासून इ० स० १९८८ पर्यंत पोर्तुगीज लोकांनी पुष्कळ हिंदूस या मठांत ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. इ० स० १५८८ मध्ये तर ६४०० हिंदू लोकांस फक्त वसईस बाप्तिस्मा घ्यावा लागलाः वरील संख्येवरून त्या काळी एकंदर कोकण प्रांतांत पोर्तुगीज लोकांनी किती हिंदू लोकांस बाटविलें असेल याची कल्पनाही होणे अशक्य आहे. सतराव्या शतकांत वसई येथील जेसूईट लोकांचा अतिशय भरभराट झाला होता, असें नयर साहेबानें इ० स० १६७५ त लिहून ठेविलेले आहे. - वर सांगितलेल्या मठांत दोन थडगी आहेत. त्यापैकी एकावर " पाठशालेची आश्रयदाती इसाबेल डी आगुइर विधवा हिचे हे थडगें" असे लिहिले आहे, व दुसऱ्यावर “हे थडगे डोना फिलिपा डा फॉन्सीका विधवा हिचे आहे. या दानशूर बाईने आपली सर्व संपत्ति आपल्या हयातीत या मठास दिली. ही बाई इ० स० १६२८ च्या जुलै महिनाच्या २० व्या तारखेस मरण पावली" असे लिहिलेले आहे.