पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५०) महादेवाचे देवालय आहे. ते बहुधा पेशव्यांनी बांधलें असावं. या देवालयाशी समांतर असें नोसा सिनोरा डाव्हिडा याचे देवालय आहे. वसई प्रांतांत जी ख्रिस्ती देवालये आहेत त्या सर्वांत हे जुनें देवालय आहे. गेमेली क्यारेरी याने इ० स० १६९५ त या देवालयाचे असें वर्णन केले आहे की, “ या देवालयांत तीन उत्तम स्थंडीलें आहेत." अलीकडे या देवालयाच्या गाभाऱ्यावर नवीन इमारत उभारून तेथे साखर तयार करण्याचा का. रखाना सुरू केला होता. परंतु त्यांतील पुढारी मंडळीस त्या कामांत फारसे यश न आल्यामुळे तो इ. स. १८७४त बंद पडला. वर सांगितलेली इमारत बांधली त्या वेळी पाया खोदतांना एक थडगें उकरलें, त्या वेळी त्यांत मनुष्याचा व घोड्याचा असे दोन सांगाडे सांपडले. पूर्वी युरोप खं. डांत अशी एक चाल होती की, एखादा सरदार मरण पावला तर त्याच्याबरोबर त्याचा घोडाही जिवंत पुरीत असत. अशाच प्रकारची एक गोष्ट इ० स० १७८१ त जर्मनी देशांत ट्रीब्ज येथे घडून आली होती. वर सांगितलेल्या देवालयाच्या उजव्या बाजूस एक इमारत ढासळून पडलेली आहे. तेथें पूर्वी हासपिटलर्स म्हणून पोर्तुगीज लोकांमध्ये एका पंथाचे लोक होते त्यांचा मठ होता ( इ० स० १६८१ ). परंतु ह्या पंथांतील लोक वसई येथे मुळींच उदयास आले नाहीत जिथोडेसे पुढे गेले म्हणजे जेसूईट लोकांचा पडापड झालेला पूर्वीचा मठ लागतो. या मठाचे दर्शनी काम इतकें सुबक आहे की, तशा मासल्याचे काम वसईस जुन्या डॉतड्याचा अडग उकरले, त्यात बांधली त्या. १८७४