पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हा वसईचा सुभेदार होता व त्याच्या मदतीस म्हणून गोंकालो कोएल्हो डा सिलव्हा फेरीरा व जाओ बोटो माकाडो वगैरे सरदार होते, त्या वेळी सेंट झेविअर याच्या आश्रयाखाली इ. स. १६३१ त ही इमारत बांधली," असा लेख आहे. - वर सांगितलेल्या इमारतीच्या शेजारीच दुसरी एक जमीनदोस्त झालेली इमारत आहे. तीत पूर्वी वसईचा दुय्यम अधिकारी रहात असे. तिला लागून दुसरी एक मोठी पडकी इमारत आहे. ती पूर्वी धान्याची कोठा होती. तेथून जरा पुढे गेले झणजे एक चर्च (ख्रिस्ती देवालय ) व हॉसपिटल आफ पिटी (गरीबांचा दवाखाना ) अशा दोन इमारती लागतात. हॉसपिटल आफ पिटि ही इमारत लांबच लांब असून तिचा चौक फार मोठा आहे. देवालयाची इमारत लहानच आहे, परंतु तिचे बांधकाम फार सुरेख आहे. या देवालयांत दोन थडगी आहेत. एकावर "केब्राल डी नाव्हीस व त्याचा पुत्र हीरोनिमो केबाल, व त्यांचे वारस यांचे थडगें" असे शब्द आहेत, व दुसऱ्यावर कांहीं पोर्तुगीज अक्षरे आहेत. वर सांगितलेला दवाखाना ही फार जुनी संस्था असून तिला पोर्तुगीज सरकारांतून दरमहा सुमारे ५० रुपयांची नेमणूक होती; शिवाय गरीब लोकांकरितां तांदूळ खरेदी करण्याकरितां सालीना १७० रुपयांची नेमणूक होती. हल्लीच्या स्थितीशी तुलना केली तर वरील नेमणूक अगदीच अल्प होती असें वाटेल, परंतु त्या वेळची देशस्थिति लक्ष्यांत आणिली असतां त्या नेमणुकांतून हजारों गरिबांस अन्न मिळत असे. मागे सांगितलेल्या देवालयापासून थोड्याच अंतरावर