पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याचे नांव गारशिया डीसा असें होते, व त्याने तो इ० स० १५३६ त बांधला." वर सांगितली गढी पोर्तुगीज लोक वसई येथे येण्याचे पूर्वीच बांधलेली होती व ती मूर लोकांचे ताब्यात होती, असें ओरिएंटल क्रानिकलमध्ये लिहिलेले आहे. या गढीच्या जरा मागच्या बाजूस कांहीं पडक्या भिंती दृष्टीस पडतात. तेथे पूर्वी दोन भव्य वाडे होते. एक वसईच्या सुभेदाराचा व दुसरा पोर्तुगीज लोकांच्या उत्तरकोंकणांतील वसाहतींच्या मुख्य अधिकाऱ्याचा. गढीच्या दरवाजाच्या मागच्या बाजूस समुद्राकडील दरवाज्यापासून जी गल्ली लागते तिच्या शेवटाशी एक मोठी टोलेजंग इमारत लागते. येथे पूर्वी न्यायाधीशाची कचेरी होती. तेथें पूर्वी आगस्टीनियन ह्मणून एक ख्रिस्ती धर्माचा पंथ आहे त्या पंथांतील लोकांचे देवालय व मठ ही होती असेंही कांहीं, ह्मणणे आहे. वर निर्दिष्ट केलेल्या इमारतीच्या देवडीला पांच पायऱ्या आहेत, व पुढच्या अंगास तिला चार खांब असून तिला तीन कमानदार दरवाजे आहेत. जरा पुढे गेले झणजे दोन मोठाले दगड पडलेले आहेत व त्या प्रत्येकांवर पोर्तुगीज भाषेत शिलालेख लिहिलेला आहे. एकावर "ही देवडी लिनहारेसचा कौंट डॉम मिग्युएल डी नोरोल्डा हा सुभेदार असतां बांधली, व तिच्यावर ग्रामदेवता ह्मणून सेंट फ्रान्सिस झेविअर याची प्रतिमा बसविलेली होती. ता. १० मे इ. स. १६३१,” असा लेख लिहिलेला आहे, व दुसऱ्यावर जेव्हां गासपर डी मेली