पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४७) त्या वेळी वसई येथे जे पोर्तुगीज बडे लोक होते त्यांना आपल्या बायका देवालयांत साधारण लोकांच्या नजरेस पडूं नयेत असे वाटत असे, व तेवढ्याकरिता त्यांनी आप. ल्या बायकांकरितां म्हणून ती वाट मुद्दाम तयार केली होती, डा कुन्हा याने वसईचे जे वर्णन केले आहे त्यांतही असेंच लिहिलेले आहे. समुद्राकडे तोंड करूनउभे राहिले म्हणजे वर सांगितले. ल्या दरवाज्याच्या डाव्या बाजूस एका गल्लीच्या शेवटी एक मोकळे पटांगण दृष्टीस पडते, व त्याच्या सभोवार नाश पावलेल्या उत्तम उत्तम इमारतींचा अवशेष भाग अद्यापि दृष्टीस पडतो. या पटांगणाचे पलीकडे एक दरवाजा आहे. त्याची हल्ली पडापड झालेली आहे. पूर्वी किल्लयांत एक वाटोळी गढी होती, तिचा हा दरवाजा होय. या दरवाज्याच्या दोन बाजूंस पूर्वी दोन मोठे दगडी खांब होते. या खांबांच्या माथ्यावरील दगड मात्र हल्ली दृष्टीस पडतात. बाकीचे काम . नाहीसे झाले आहे दरवाज्याच्या शिरोभागी एक क्रॉस, एक चिलखत, एक वर्तुळ अशा खुणा खोदलेल्या असून. इ० स० १६०६ असा सन घातलेला आहे. दरवाज्याच्या आंत जिकडे तिकडे नाश पावलेला अवशेष भाग पडलेला आहे, व डाव्या अंगास एक बुरूज ढासळून पडलेला आहे. त्याच्या एका दगडावर एक लेख आहे, व तो वसईच्या किल्ल्यांतील सर्व लेखांत अगदी जुना आहे, तो लेख येणेप्रमाणे:--

  • ज्या पहिल्या पोर्तुगीज कपतानाने हा किल्ला बांधला