पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भिंती वृक्षाच्छादित आहेत. दरवाज्यावर पोर्तुगीज भाषेत एक लेख आहे त्याचे भाषांतर येणें प्रमाणे: "डान फ्री आलीक्झॉ डी मेनेझेस हा आर्चबिशप मिमेट होता, व रेवरेंड पेड्रोगालव्हाओ पेरीरा हा व्हिकार होता, तेव्हां इ० स० १६०१ या वर्षी या देवालयाचा जीणोद्धार झाला." ___ या इमारतीचे दर्शनी बुरूज, कमानदार दरवाजे, ऊंच परंतु अरुंद अशा तिच्या खिडक्या इत्यादि भाग अद्यापि फार चांगल्या स्थितीत आहे, परंतु तिचे छप्पर पडून गेलें आहे, व मनोन्याच्या पायऱ्या ढासळून पडल्या आहेत. मुख्य स्थंडिलाच्या उजवे बाजूस कठड्याच्या पलीकडे एका कबरीवर पोर्तुगीज भाषेत खाली दिलेला लेख लिहिलेला आहे:__“ ज्या प्रभूने त्या देवालयाचा जीर्णोद्धार करून त्याची उत्तम व्यवस्था केली त्याचा सेवक पड्रो गालव्हाओ यास येथे मूठमाती दिलेली आहे." तो गोवें येथे ता. १० मार्च इ०स० १६१८ त मरण पावला. __पश्चिमेकडील - कोपऱ्यास एक अर्धे बांधलेलें थडगें आहे, व त्यावर आंटोनियो डी आलमीडा सामपायो सू" असें नांव खोदलेले आहे. हे देवालय मूळ पोर्तुगालचा राजा तिसरा डाम जोओ याच्या हुकुमावरून सुभेदार डाम जोओ डीकास्ष्ट्रो याने इ० स० १९४६ त बाघल. हैं देवालय व त्याच्या उजव्या अंगास दुसरी एक इमारत आहे यांच्यामध्ये एक बांधीव वाट असून तिच्यावर कमानी केलेल्या आहेत. "यावरून असा तर्क होतो का,