पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनांत आले, व त्याने एक गिरणीही बांधली. परंतु तितक्यांतच तो साहेब मरण पावला, व सर्व त्याचे बेत जागच्या जागीच राहिले. इ० स० १८३८ पासून वसईचा किल्ला अगदीच ओसाड स्थितीत आहे. इ० स० १८५२ त किल्लयांतील एक चर्च दुरुस्त करून काही लोकांनी तेथे साखरेचा कारखाना सुरू केला. परंतु त्या व्यापारांत त्यांना बूड आली, त्यामुळे पुनः तो किल्ला ओसाड पडला, व हल्लीही तशाच स्थितीत आहे. किल्लयांत. हनुमानाचे व त्रिविक्रमाचे अशी दोन देवालये आहेत. त्रिविक्रमाच्या देवालयास सरकारांतून सालीना १०६ १ रूपयांची नेमणूक आहे. इ० स० १८८० त मेजर लिटलवूड नांवाच्या गृहस्थाने तीस वर्षांचे कराराने हा किल्ला घेतला, व त्याने आंत लागवड वगैरे केली. पुढे त्या साहेबाची बायको व मुलगा ही या किल्लयांत राहून आंत शेतीभाती करीत होती. वसईच्या किल्ल्यांत पाहण्यासारखी जी स्थले आहेत त्यांचे वर्णन येणेप्रमाणे:-- समुद्राकडच्या बाजूने आपण निघालों म्हणजे प्रथमतः किल्ल्याचा दुहेरी भक्कम दरवाजा लागतो. या दरवाज्याला एक लोखंडी व एक सागवानी अशी दोन निरनिराळी झडपे असून अद्यापि ती फार चांगल्या स्थितीत आहेत. यांपैकी एका झडपावर २० नवंबर १७२० ' असा पोर्तुगीज भाषेत लिहिलेला लेख आहे. दरवाज्याचे आंत डाव्या बाजूस एक लहानसें मारुतीचे देवालय आहे. त्याच बाजूस सेंट जोसेफ याचे देवालय आहे. या इमारतीला एक मोठा भक्कम उंच मनोरा असून त्याच्या