पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मार्गाने वसईस आला. या ठिकाणी कर्नल क्लोज व एल. फिन्सन हे इंग्लिशांचे सरदार होते, त्यांच्याशी त्याने तहाचे बोलणे सुरू केले. हा तह ता० ३१ दिजंबर इ० स० १८०२ रोजी झाला. बाजीराव एप्रिल महिन्यापर्यंत वसई येथे होता, व इंग्लिशांनी त्या ठिकाणी त्याचा फार उत्तम बंदोबस्त ठेविला होता. पुढे बाजीराव हळूहळू इंग्लिशांविरुद्ध कारस्थाने करूं लागला, तेव्हां त्याचा बंदोबस्त करणे इंग्लिश सरकारास भाग पडलें, व इ० स० १८१७ त त्यांनी त्याच्याशी नवीन. तह केला. हा तह झाल्यानंतर वसईसकट सर्व उत्तर कोकण इंग्लिशांनी आपल्या ताब्यात घेतलें. इ० स० १८१८ त वसईच्या किल्लयाचा खंदक बहुतेक भरून गेला होता. त्याच्या तटावर झाडेझुडपें उगवली होती, व राहण्यासारखे असे किल्लयांत एकही घर नव्हते. काही वर्षेपर्यंत इंग्लिशांनी एक लहानशी फौजेची तुकडी तेथे ठेविली होती. इ० स० १८२४ त किल्ल्याच्या एका दरवाज्याशी पहारा असून त्या दरवाज्याला कुलूप घातलेलें होतें, व आंतील जागा ओसाड होती. इ० स० १८२५ त हेबर नांवाचा युरोपियन गृहस्थु हा किल्ला पाहण्यास गेला होता, त्या वेळी किल्लयांत सर्व वस्तूंचा भयानक देखावा त्याचे दृष्टीस पडला. आंत मनुष्याची तर वस्ती नव्हतीच, परंतु पूर्वीच्या टोलेजंग इमारती, व मोठमोठी खिस्ती देवालये यांची पडापाड झालेली होती, व त्यांच्या भिंतींवर मोठ मोठी झाडे वाढली होती. इ० स० १८३० त तेथे साखरेचा कारखाना काढावा असें लिंगार्ड नावाचे साहेबाचे