पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इ०स० १७६७ त वसई येथे वखार घालविण्याची डच लोकांस ईच्छा उत्पन्न झाली. इ० स १७७४त इंग्लिश लोकांनी वसई घेतली, परंतु लगेच त्यांनी तें शहर पेशव्यांस परत दिले. इ . स ० १७८० त गोदर्दसाहेब आपल्या सैन्यासह सुरतेहून पायवाटेने वसईस आला. वसईचा किल्ला अतिशय मजबूत असल्यामुळे त्याला तो घेण्यास बरेच प्रयास पडले. या वेळी पेशव्यांचे घराण्यांत आपसांत तंटे लागले होते, व राघोबादादा मुंबई सरकारचे आश्रयास जाऊन राहिला होता.इंग्लिशांनी राघोबास गादीवर बसविण्याचे वचन दिले होते, त्यामुळे इंग्लिश व मराठे यांच्यांत लढाई सुरू झाली होती. गोदर्दसाहेबाने तारीख २८ नोवेंबर रोजी ९०० यार्ड अंतरावरून किल्ल्यावर आपल्या तोफखान्याचा मारा चालविला. प्रथमतः मराठे त्याला दाद देईनात; तेव्हां त्याने आणखी मोठ मोठया ९ तोफा आणिल्या व ता० ९ दिजंबरपासून मोठ्या जोराने किल्ल्यावर तोफांचा भडिमार चालविला. तारीख १० रोजी तटाला खिंडार पडले तेव्हां किल्लेदार किल्ला खाली करून देण्यास कबूल झाला, परंतु इंग्लिश ती गोष्ट कबूल करीतात. दुसरे दिवशी इंग्लिशांनी ज्या अटी सांगितल्या त्या कबूल करून मराठ्यांनी तो किल्ला त्यांच्या स्वाधीन गेला. पुढे सालबाईचा तह (इ० स० १८०२) झाल्यावर इंग्लिशांनी तो किल्ला मराठयांस परत दिला. इ० स० १८०२ त यशवंतराव होळकर पुण्यावर चाल करून आला, त्या वेळी दुसरा बाजीराव पुण्याहून पळून रत्नागिरी जिल्ह्यांत सुवर्णदुर्ग येथे गेला, व तेथून जल