पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बांधून तरी माझे सर्व सरदाराना किल्यांतील तोंडी बांधून तरी माझे डोके किल्लयांत पाडावें, नाही तर किल्ला घ्यावा.” त्या वेळी सर्व सरदारांनी आपला निश्चय तोच आमचा नेम आहे, परंतु काही तरी किल्लयांतील भेद समजल्याशिवाय तो हस्तगत होणे कठीण, याकरितां त्याची काही तरी मसलत काढिली पाहिजे, " असें सांगितले. पुढे सर्वानुमतें असें ठरले की, खंडूजी माणकर याने गुराख्याचा वेष घेऊन किल्लयांत शिरकाव करावा, अंजूरकर म्हणून पांचकळशा सुतार होता त्यांने किलयांत जाऊन सुतारकीचे काम करावें, व दुल्लभाजी मोरे या नांवाच्या सरदाराने आंत जाऊन कासाराचा धंदा करावा, व अशा रीतीने तिघांनी किल्लयांतील भेद काढावा. या बेताप्रमाणे तिघेही किल्लयांत शिरले, व त्यांनी आंतील सर्व बातमी आणिली. नंतर मराठयांनी आपल्या लष्करांतून किल्ल्याच्या तटापर्यंत एक सुरुंग तयार केला, व त्यांत दारूचे बुदले भरून त्यांस बत्ती दिली. त्या वेळी किल्ल्याचा एक बुरूज उडाला, परंतु तो पुनः जागच्याजागी बसला, खाली ढासळला नाही. नंतर दुसरा सुरुंग तयार केला, व त्याच्यायोगाने मराठ्यांचा कार्यभाग साधला. या वेळी आप्पाच्या थोरपणाची. अशी एक गोष्ट सांगतात की, किल्लयांतील एका मुख्य फिरंगी सरदाराची बायको किल्याच्या पश्चिमेच्या आंगच्या चोर दरवाज्याने बाहेर पडून गोव्यांस पळून जाण्याकरितां मचव्यांत बसली. परंतु आंग्र्योंन ते मलबत पकडून तिला कैद केलें, व चिमणाजी आप्पाकडे पाठवून दिले.ती बाई फार सुस्वरुप होती. आप्पाने तिला पाहतांच "ही कशाला धरून आणिली ?"