पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झाले. पोर्तुगीज लोकांनी तट पडल्या जागी मातीच्या टोपल्या रचून त्यांची भिंत तयार केली, व तेथून ते तोफा डागू लागले. हा वेढा एकंदर तीन महिने पडला होता. मराठ्यांनी पोर्तुगीज लोकांची सर्व सामग्री बंद केली होती. त्यामुळे पोर्तुगीज लोकांची उपासमर होऊ लागली. खुषकीच्या बाजूने चिमणाजी आप्पा, व समुद्राच्या बाजूने मानाजी आंग्रे वेढा देऊन बसले होते. अशा रीतीने पोर्तुगीज लोकांचा कोंडमारा झाला होता. शेवटी पोर्तुगीज लोक मराठ्यांस शरण आले, व त्यांनी तहाचे बोलणे सुरू केले. ता. १६ मे सन १७३९ रोजी उभय पक्षी तह झाला. या वेढ्यांत पोर्तुगीज लोकांचे सुमारे ८०० व मराठ्यांचे ५ हजारांवर लोक जायां झाले, असा चिमणाजी आप्पाचा स्वदस्तुरचा लेख आहे. आप्पाने हा बळकट किल्ला छातीचा कोट करून सर केला. अशा प्रकारचे वेढ्याचे काम मराठ्यांचे हातून दुसरे झालेच नाही, असे म्हटले तरी चालेल. मराठी दप्तरांत या वेढयांत मेलेल्या व जखमी झालेल्या लोकांची एकंदर संख्या १२ पासून १४ हजारांपर्यंत दिलेली आहे. हा इतिहास ग्रांटडफ साहेबांनी आपल्या बखरीत दिला आहे. पेशव्यांचे बखरीत या वेढ्याचे संबंघाने असे लिहिले आहे की, तीन महिनेपर्यंत मोठ्या निकराने लढूनही किल्ला हाती येत नाही असे पाहून चिमणाजी आप्पा फार निराश झाला. एके दिवशी त्याने आपल्या सर्व सरदारांस जवळ बोलावून असे सांगितले की, " किल्ला हस्तगत होत नाही, करितां मजला तोफेचे