पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करतां येईना. नंतर किल्ल्याचे भिंताड पाडावे या हेतूने मराठ्यांनी तटाखाली सुरंग खोदले. परंतु पोर्तुगीज लोकांनी त्याच बेताने तटाचे आंतून जमीन खोदून ठेविल्यामुळे मराठ्यांचा तो प्रयत्न व्यर्थ गेला. नंतर मराठ्यांनी पुनः पांच सुरुंग तयार केले. त्यांपैकी तीन अगदी जवळजवळ होत,व दोन बेरच अंतरावर होते. प्रथमतः दोहोंपैकी एकाला आग घातली, परंतु तो चांगलासा उडाला नाही. म्हणून जवळ जवळ जे तीन होते त्यांना आग घातली. परंतु . त्यांपैकी प्रथमतः फक्त दोनच उडाले, व त्यामुळे तटाला बरेच मोठे खिंडार पडले. त्या वेळी मराठे मोठ्या वीरश्रीने किल्लयांतील मंडळीवर हल्ला करण्याकारतां धावत गेले, व कांहीं तटावरही चढले. परंतु त्या आणीबाणीच्या प्रसंगी राहिलेला तिसरा सुरुंग एकदम उडाला, व तो इतक्या जारोन उडाला की, त्या ठिकाणी मराठ्यांचे हजारों लोक प्राणास मुकले. तटावरील लोकांच्या चिंधड्या चिंधड्या होऊन ते हवेत परांप्रमाणे उडाले. तटाखालचे लोक तट पडल्यामुळे चुरडून मेले व जे थोडेसे शिल्लक राहिले, त्यांच्यावर पोर्तुगीज लोकांनी गोळ्यांचा वर्षाव करून त्यांचाही फडशा करून टाकिला. नंतर पांचव्या सुरुंगास आग घातली. हा सुरुंग सेंट सबास्टियन नांवाच्या बुरुजाखाली खोदलेला होता, व तो मल्हारराव होळकराच्या देखरेखीखाली तयार केलेला होता. हा सुरुंग उडतांच अर्धाआधिक बुरूज ढासळून खाली पडला. मराठयांनी या ठिकाणी एकदम लगट केली. या झटापटींत पोर्तुगीज लोकांचे ४० लोक ठार झाले, व शंभरांवर जखमी झाले. मराठ्यांचेही बरेच लोक जायां