पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३८) त्याच्याबरोबर मल्हारराव होळकर, विठ्ठल शिवदेव विंचुरकर, राणोजी शिंदे, शंकराजी नारायण, मानाजी आंग्रे, पिलाजी जाधव वगैरे सरदार आपापल्या फौजेसह आले होते, व खंडूजी माणकर, कृष्णाजी नाईक वगैरे सरदार साष्टी, धारावी वगैरे किल्ले घेऊन मागाहून येऊन मिळाले. वेढ्याचे काम धीरे धीरे चालले होते, व दररोज तोफांचा मारा किल्लयावर चाललाच होता. काही दिवसांनी वसईचा किल्लेदार सिलव्हेरिया डी मेनेझेस याने चिमणाजी आप्पा याजपाशी असें बोलणे लाविलें की, "जंजिन्याच्या शिदीप्रमाणे तुम्ही आम्हांशी तह करण्यास कबूल असाल तर आम्ही वसईच्या आसपासचा सर्व मुलूख तुम्हांस देतो." परंतु चिमणाजी आप्पास ती गोष्ट पसंत पडली नाही. त्याला असे वाटले की,वसईसारखा मजबूत किल्ला पोर्तुगीज लोकांचे हाती ठेवून शेजारचा प्रांत आपणांस मिळाला एवढ्याच गोष्टीचा संतोष मानून जर आपण आज निघून गेलो तर त्या लोकांना आपला गेलेला मुलूख परत जिंकून घेण्यास फारसे आयास पडणार नाहीत, व ते पुनः आपणांस उपद्रव देतील. त्यामुळे चिमणाजी आप्पाने ते बोलणे अमान्य करून वेढ्याचे काम मोठ्या झपाट्याने चालविलें, व पावसाळा सुरू होण्याचेपूर्वी वसईचा किल्ला सर करण्याचा त्याने निश्चय केला. त्याने किल्ल्यास मोर्चे लाविले. पोर्तुगीज लोकांनी मराठ्यांवर तोफांचा एकसारखा मारा चालविला, त्यामुळे पुष्कळ मराठे प्राणास मुकले. पुढे मराठ्यांनी मोठमोठ्या तोफा आणून किल्ल्यावर भडिमार सुरू केला,व तटाला एक लहानसें खिंडार पाडले. परंतु त्यांना हल्ला