पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

म्हणतो की, वसईतील सर्व संपत्ति आळशी बडे लोकांनी पुरून टाकिली होती. ते आपला काळ सुखांत व चैनीत घालवीत, ते मोठे गर्विष्ट असत, व आपल्या देशाच्या सत्तेचा हास होत चालला आहे, या गोष्टीची त्यांस गुमानही नसे." इ० स० १७२० त वसईच्या किल्ल्याची स्थिति तपासण्याकरितां गोव्यांहून एक अमलदार आला होता, त्याने असें लिहिले आहे की, " तटाच्या बाहेरच्या सर्व मान्याच्या जागांची अव्यवस्था झाली आहे, सर्व मेढेकोट व तट मोडकळीस आले आहेत, किल्लयांत पुरेशी शिबंदी नाही, व आंत जे काही थोडेसे लोक आहेत, ते अशिक्षित असून त्यांस कवाइतीची मुळीच माहिती नसल्यामुले त्यांचा उपयोग फक्त एखादा दरवडा घालण्यांत फार चांगला होईल!" अशा प्रकारे दुर्बळ झालेल्या वसई शहराच्या सभोवार मराठे लेक हळूहळू घिरट्या घालू लागले. इ . स ० १७३८ त मराठ्यांनी वसईच्या उत्तरेस अरनाळा म्हणून जो किल्ला आहे तो घेतला. त्याचप्रमाणे वरसोवा व धारावी ही बेटेही त्यांनी हस्तगत केली, व वसईच्या दोहों बाजूच्या खाड्या आपले ताब्यात घेऊन त्या शहराचे सर्व दळणवळण बंद पाडले, त्याच वेळी मराठ्यांची धाड गोव्यांवरही जाऊन पडल्यामुळे पोर्तुगीज लोकांस वसईस कुमक पाठवितां येईना, व वांदरें येथील जेसूईट लोक फार वर्षांपासून मुंबईच्या इंग्लिश लोकांस अतिशय त्रास देत असत, त्यामुळे त्यांनीही पोर्तुगीज लोकांस मदत देण्याचे नाकारले. चिमणाजी आप्पा बरोबर मोठी फौज घेऊन वसईस आला, व तारीख १७ फेब्रुवारी इ० स० १७३९ त त्याने वेढ्याचे काम सुरू केले. त्या वेळी