पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कारणांमुळे पुष्कळ लोक वसई सोडून गेले होते. तसेच पुष्कळ वर्षे एक भयंकर साथीचा *रोग उत्पन्न झाला होता त्यामुळे, इ० स०१६९० त त्या शहरची सुमारे १ लोकसंख्या कमी झाली होती. अठराव्या शतकाच्या प्रारंभी वसईची लोकसंख्या ६०४९९ होती. या संख्येपैकी बाटे लोकांची संख्या ५८१३१ होती, अस्सल युरोपियन लोकांची संख्या २३६८ होती. त्याच वेळेच्या सुमारास वसईचे असें वर्णन केलेले आहे की, वसई हे एक लहानसे व्यापाराचे बंदर आहे. हामिलटन साहेब असें नांतील पोतुगजि सुभेदार राजद्रोही झाले असून ते आपल्या ताब्यांतील किल्लयांची दुरुस्ती मुळीच करीत नाहीत असे म्हटले आहे. डा कुन्हा याने दिलेल्या वसईच्या वर्णनांत तो असे लिहितो की, ज्यांनी खिस्तीधर्म स्वीकारिला नव्हता त्यांचे संबंधाने नियम फारच कडक होते, कोणाही हिंदूला घोडेवाल्याशिवाय दुसरी चाकरी देऊं नेये, व कोणावरही लवमात्र दया करूं नये, कोणालाही सरकारी कामांत घेऊं नये, सर्वानी आदित्यवारी संध्याकाळी पाद्री साहेबांचे धर्मपर व्याख्यान ऐकण्याकरितां खिस्ती देवालयांत आले पाहिजे; जो कोणी येणार नाही त्याला ४ आण्यांपासून आणेपर्यंत दंड द्यावा लागत असे. गोवझ नांवाच्या साहेबाने इ०स० १६०३ मध्ये असें लिहून ठेविलें आहे की, पोर्तुगीज लोकांनी जे खिस्ती झाले नाहीत त्यांना इतके छळले की, पुष्कळ हिंदु, मुसलमान व पारशी तो प्रांत सोडन शहाजहान बादशाहाचे राज्यांत जाऊन राहिले. दमण व वसई यांच्या दरम्यान धर्मातर न केलेले असे फार थोडे लोक राहत असन, त्या प्रांतांतील बहुतक जमीन लागवडीशियाय पडलेली होती.

  • ह्या रोगाचे संबंधानें गेमेली क्यारेरी याने असे वर्णन केले आहे की, "हा रोग हिंदुस्तानच्या पश्चिम भागांत फार झाला होता. त्यांची लक्षणे म्हटली म्हणजे प्रथमतः कानांचेमागें, काखांतून व आडसंधींतून टाक्षाएवढे वाधणे येत असत, व बुबुळांच्या सभोवतालचा डोळ्याचा भाग तांबडा होत असे. ही चिन्हें झाली म्हणजे मनुष्य आपल्या जिविताची आशा सोडून पुढच्या तयारीस लागे."