पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३५) लेली होती. बडे लोक भव्य हवेल्यांतून राहत असत. आंत ६ प्राथनागृहें, ४ मठ, व दोन पाठशाळा होत्या. " सतराव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीज लोकांच्या सत्तचा हास होऊ लागला, त्या वेळी वसई शहरास फार मोठा धक्का बसला. इ० स० १६७४त मस्कतचे ६०० मुसलमान चांचे लोक वसईस आले. त्या वेळी तेथील शिबंदी इतकी घाबरून गेली की, त्या चांचे लोकांनी तटाच्या बाहेरील लोकांवर भयंकर रीतीने जुलूम केले, व सर्व देवालयांतील चीजवस्त लुटून नेली, तरी तिने त्या लोकांस काहीएक अडथळा केला नाही. त्याच वर्षी मोरो पंडित म्हणजे मोरोपंत पिंगळे याने कल्याण येथे मराठयांचें कायमचे ठाणे दिले, व वसईच्या उत्पन्नापैकी एक चतुर्थांश उत्पन्न पोर्तुगीज लोकांनी दिले पाहिजे अशी अट त्यांच्याकडून कबूल करून घेतली. इ० स० १६७६ त शिवाजी स्वतः वसईच्या आसपास आला व पोर्तुगीज लोकांस न जुमानतां त्याने सिबन नांवाच्या जागेला तटबंदी केली. इ०स० १६९० त मराठ्यांनी वसईस वेढा दिला; परंतु त्या वेळी त्यांना यश मिळाले नाही. वसईची स्थिति दिवसें दिवस ज्यास्त बिघडत चालली होती. तेथचे सुभेदार अप्रामाणिक रतीने वागू लागले होते, वरिष्ठ प्रतीचे पोर्तुगीज लोक दुराचारी बनले होते, पाद्रीलोक ज्या त्या कामांत आपलेंच घोडे पुढे ढकलू लागले होते व एकंदर पोर्तुगीज लोक, ज्यांनी त्यांच्या धर्माची दीक्षा घेतली नव्हती, त्यांस अतिशय गांजू लागले होते. वरील *इ० स०१५८७त स्पेनचा राजा दुसरा फिलिप याने हिंदुस्ता