पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बंद केला. त्या वेळी सर्व पोर्तुगीज पाद्री आपल्या देवालयांत जाऊन मोठ्या दीन स्वरानें व अनन्यभावाने परमेश्वराची करुणा भाकू लागले. तेव्हां त्या जगदीशास दया येऊन त्याने एकदम मेघ राजास आज्ञा केली. त्याबरोबर सर्व आकाश ढगांनी व्यापून गेले, व दुसऱ्या दिवसा पासून पर्जन्यास सुरवात झाली. नंतर हळू हळू पुनः आबादानी होत चालली. सतराव्या शतकांतील युरोपांतील फिरस्त्यांनी वसई शहराचें असें वर्णन केले आहे की, " वसई हे एक सुंदर तटबंदीचे शहर असून एक उत्तम बंदर आहे. त्या प्रांतांत तांदूळ, डाळ, व इतर धान्ये, तेल, नारळ वगैरेचे चांगले उत्पन्न आहे. शहराचा तट दगडी असून त्याचा घेर तीन मैलांचा आहे. तटाला एकंदर तीन दरवाजे आहेत. त्यांपैकी दोन मुख्य आहेत. एक पूर्वेकडील तटांत आहे व दुसरा पश्चिमेकडील तटांत आहे. दक्षिणेच्या बाजूस एक लहानसा दरवाजा आहे. तटाला एकंदर आठ बुरूज आहेत. परंतु त्यांपैकी काही अपुरे आहेत. दक्षिणेच्या किंवा समुद्राकडच्या बाजूस जेथून हल्ला येण्याचा संभव कमी आहे, तेथे एकेरी तट बांधलेला आहे. किल्ल्यावर ४०० गोरे, २०० बाटे, व १८०० गुलाम मिळून २४०० लोकांची शिबंदी आहे. उच्चप्रतीच्या पोर्तुगीज लोकांकरितां शहराचा काही भाग अगदी वेगळा तोडून घेतलेला होता. कोणाही हिंदूला किंवा धंदेवाल्या मनुष्याला तटाचे आंत राहू देत नसत. किल्लयाच्या आंतील रस्ते रुंद व सरळ रेषेत होते. मध्यंतरी बाजाराची जागा असून तिच्या सभोवार सुंदर मंदिरे बांध