पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असत, व कोठे तरी दूर जाऊन पडतं. विश्वाचा अंत झाला म्हणजे जी स्थिति होईल अशी कल्पना आहे, ती स्थिति त्या वेळी वसई शहराची झाली होती. मद्रास जर्नल भाग ५ यामध्ये या संबंधाने असे वर्णन केलेले आहे की, इ० स० १६१८ त म्हणजे सुरत येथे इंग्लि. शांनी आपलें ठाणे घातल्यानंतर सहा वर्षांनी मुंबईच्या आसपासच्या किनाऱ्यावर एक भयंकर तुफान झालें. प्रथमतः तारीख १५ मे रोजी तें वसई येथे सुरू झाले. त्याचा जोर एवढा मोठा होता की, आपली घरे एकदम जमीनदोस्त होतील व त्यांतच आपला अंत होईल या भीतीने तेथील लोक तळघरांत जाऊन लपून बसले. रात्रीस २ वाजण्याचे सुमारास एक धरणीकंपाचा धक्का बसला व शेकडों घरें जमीनदोस्त झाली; वाऱ्याच्या जोराने समुद्राचे पाणी शहरांत शिरले; लाटांचा भयंकर आवाज होऊ लागला; देवालयांची खपरेले उडून गेली; हजारों दगड उडून लांब जाऊन पडले; दोन हजार मनुष्ये प्राणास मुकली; तळ्यांतील मासेही भरून गेले; जसजसे तुफान वाढत गेलें तसतशी बहुतेक देवालये जमिनीस मिळत चालली; बंदरांतील पुष्कळ व्यापारी गलबतें बुडून तबास गेली. हे वादळ होऊन गेल्यानंतर पावसाने इतके डोळे वटारले की, पावसाचें कांहींच चिन्ह दिसेना. त्यामुळे थोड्याच महिन्यांत दुष्काळाचे स्वरुप इतकें भयंकर होऊन गेले की, आईबाप आपल्या स्वतःच्या पोटाची आग शांत करण्याकरितां आपल्या पोटच्या गोळ्यास भरबाजारांत मुसलमान व्यापाऱ्यांस विकू लागले. नंतर जेसूईट पाद्री लोकांनी मोठी रकम गोळा केली व तिच्यांतून ते त्या गरीब लोकांस खाण्या-. करितां देऊ लागले, व अशा रीतीने त्यांनी तो विक्रय