पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इ० स० १६१८ त वसईवर फार मोठे अकल्पित अनर्थ गुजरले. प्रथमतः एक आजाराची भयंकर साथ शहरांत व किल्लयांत आली, व तिच्या योगानें हजारों लोक मरण पावले. याच साथींत तेथच्या पाद्री लोकांतील मुख्य इमान्यूएल अंकोस्टा हा ता० १५ मे रोजी मरण पावला. त्याचे प्राणोत्क्रमण होण्यापूर्वी त्याने असे सांगितले होते की, झाले हैं कांहींच नाही, याहूनही भयंकर अनर्थ यापुढे वसई येथे गुजरणार आहेत. पुढे त्याचे प्राणोत्क्रमण झाल्यावर लगेच आकाश मेघांनी आच्छादित झालें, विजांचा कडकडाट सुरू झाला, व मोठा झंजावात सुटला. अस्तमान समयी मोठी वावटळ सुटून समुद्राचे पाणी इतके वाढले की, किल्लयांतील सर्व लोक अतिशय भिऊन गेले, व जलप्रलय होण्याची वेळ आजच येऊन ठेवली की काय, असे त्यांस वाटू लागले. बंदरांतील शेंकडों तारवें एकमेकांवर आपटून फुटून गेली. किल्लयांतील व बाहेरील शेंकडों घरें वायाने पाडून टाकली, व शेकडों घरांची छपरें उडवून नेली. *फ्रान्सिसकन व आगस्टीनियन लोकांचे मठ धुळीस मिळाले. जेसूइट लोकांची तीन भव्य देवालये व त्यांचे रहाण्याचे वाडे यांच्या वरची छपरें उडून गेली व त्यांच्या भिंतींना एवढाल्य मोठ्या भेगी पडल्या की, ती घरें दुरुस्ती करण्याच्या लायकीची राहिली नाही. ताडामाडाची इतकी झाडे मोडून पडली व त्यांच्यामुळे इतका नाश याला की, त्याचे वर्णनही करता येत नाही. हजारों वृक्ष उन्मळून पडले. वाऱ्याचा जोर एवढा मोठा होता की, उंच उंच माडाची झाडे मुळासकट एखाद्या पिसाप्रमाणे आकाशांत उडत * खिस्ती लोकांमध्ये हे दोन पंथ आहेत.