पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जवळ जवळ १५०० रुपयांपर्यंत असे. कपतानास सल्ला मसलत देण्याकरितां एक आल्डरमन किंवा धर्माधिकारी असे. कपतानाच्या हाताखाली एक दुय्यम कपतान असे, व त्याच्या तैनातीस २ कारकून, दोन मशालजी व दोन हुजरे असत. किल्लयांतील व्यवस्था नीट रीतीने राखण्याकरितां एक अमलदार नेमलेला होता, व त्याच्या हाताखाली तोफखान्याचे १२ लोक दिलेले होते. किल्ल्याच्या बाहेरच्या शहराच्या बंदोबस्ताकरितां एक ठाणेदार किंवा फौजदार नेमलेला असून त्याच्या हाताखाली २० शिपाई, ४ बरकनदाज लोक, एक नाईक, एक कारकून, एक भाषांतरकता, एक सुतार, व एक नाखवा किंवा खलाशी लोकांचा नाईक इतकी मंडळी असे. इनसाफ करण्याकरितां एक न्यायाधीश नेमलेला होता. तसेच एक जज्ज, अपिलांचा निकाल करणारा दुसरा एक जज्ज, एक बारिस्टर, असे आणखी अमलदार नेमलेले होते. यांशिवाय एक समुद्राकडील बेलीफ, एक सरकारकून, एक सरकारी वकील, एक बेवारशी मालाची व्यवस्था करणारा अमलदार, एक रात्रीचा पाहरा करणारा अमलदार, व एक मेस्त्री इतकी मंडळी असे. । सतराव्या शतकाच्या प्रारंभी ( इ० स० १६०७) वसई येथें गलबते बांधण्याचा फार मोठा कारखाना चालत असे, व इमारती लायक लाकूड, व दगड यांचा फार मोठा व्यापार चालत असे. गोव्यांस मोठमोठे वाडे व इमारती वसईहून दगड नेऊन बांधीत असत. इ० स० १६१२ त मुसलमान लोकांनी या किल्लयास पुनः एकवार वेढा दिला, परंतु त्या वेळी त्यांस यशप्राप्ति झाली नाही.