पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुख्य ठाणे असून त्या प्रांतांत पुष्कळ सधन पोर्तुगीज जमीनदार रहात होते, व तेथे पोर्तुगीज लोकांच्या उत्तर कोकणांतील सर्व प्रांतांच्या सुभेदाराचें ठाणे होते, त्यामुळे वसई हे त्या वेळी एक मोठे धनाढ्य शहर झाले होते. किल्ल्याचे आंतील जागा फक्त वरिष्ठ प्रतीच्या पोर्तुगीज लोकांकरितां ठेवलेली होती; व ते दुसऱ्या कोणासही आंत येऊ देत नसत. किल्लयांतील गल्लया सरळ रेषेत होत्या, व त्यांचे चौक फार मोठे होते. आंतील सर्व इमारती दुमजली असून सुरेख होत्या व त्यांची गोपुरे आच्छादित असून, त्यांच्या खिडक्या फार मोठ्या होत्या. तसेच आंत पुष्कळ मोठमोठी ख्रिस्ती देवालये होती. म्हणजे पोर्तुगीज लोकांच्या हिंदुस्तानांतील वसाहतींची राजधानी गोवें शहर याच्या खालच्या प्रतीचे दुसरें शहर पाहूं गेलें, तर त्या वेळी फक्त एक वसई शहरच होते. शहराच्या अधिकाऱ्याला कपतान हा किताब होता व त्याच्या तैनातीस १६हुजरे, ४मशालजी, ३ पाणके, व १ छत्रधर इतकी मंडळी असे. या मंडळीचा कपतान धरून सालीना एकंदर खर्च मैल एवढा मुलूख वसई प्रांतांत मोडत असे, व त्याचे वसई, कसबे ठाणे, साष्ठी बेट, करजें बेट, बेलाफ्लोर बेट, मनोर, व असेरीम असे सात भाग केलेले होते.. त्या वेळी वसई प्रांतांत हिंदुस्तानांतील अतिशय धनसंपन्न अशा पोर्तुगीज लोकांची शंभरांहून जास्त कुटुंबें राहत होती. सोळाव्या शतकाच्या अखेरीस गोव्यांस पोर्तुगीज संतीणींकरितां एक मठ बांधला त्या वेळी वसई प्रांतांतल्या काही श्रीमंत कुटुंबांतील बायकांनी वर्गणीदाखल म्हणून २००००० झराफिन किंवा हल्लीचे शिक्का रुपये १००००० पाठवून दिले होते. यावरून त्या प्रांताच्या सधनतेची सहज कल्पना होईल.