पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांनी पोर्तुगीज लोकांचा हिंदुस्तानांतील वसाहतींचा व्हाइसराय नूनो डा कुन्हा हा वसई येथे आला वे त्याने नवीन किल्ल्याचा पाया घातला, व त्या पायाचा दगड गालवाहो याच्या हातून बसविला. त्याच वेळेच्या सुमारास पोर्तुगीज लोकांनी वसई येथील काही मशिदींचा विध्वंस करून तेथें सेंट जोसफ याचा मठ स्थापन केला. इ० स० १५३९ त गुजराथच्या मुसलमानी फौजेनें वसईस वेढा दिला, परंतु पोर्तुगीज लोकांनी त्यांस परत पिटाळून लाविलें. इ० स० १५८३ त वसई येथे भात, व इतर धान्ये,व इमारतीलायक लाकूड यांचा मोठा व्यापार चालत होता, असा दाखला सांपडतो. इ० स० १५८६त अबुल फजल याने असे लिहिले आहे की, दमण, संजाण, माहीम व तारापूर या शहरांप्रमाणे वसई हे मोठे व्यापाराचें शहर आहे, व मोंगल लोकांच्या केवळ हयगयीमुळे व आळसामुळे ती सर्व शहरे युरोपीयन लोकांच्या हातांत गेली आहेत. इ० स० १९९० च्या सुमारास वसईच्या किल्लयाचे पुनः काम सुरू केले व तो इ० स० १६०० च्या सुमारास पुरा झाला. किल्ल्याच्या भिंती कठिण दगडांच्या बांधलेल्या असून तटाला एकंदर अकरा बुरूज होते. त्याच्यावर मोठ्या तोफा ९० होत्या, त्यांपैकी २७ तोफा पितळेच्या होत्या. किल्लयाच्या रक्षणार्थ २१ जहाजांचे आरमार असून प्रत्येक जहाजावर १६ पासून १८ पर्यंत तोफा होत्या. चौल सारखा जरी वसई येथे व्यापार चालत नसे, तरी तेथें गलबतें बांधण्याचा कारखाना होता, त्यामुळे त्या शहराला विशेष महत्त्व आलेले होते. तसेच तेथे सुपीक अशा वसई प्रांताचें * वसईच्या उत्तरेस १० मैल, पूर्वेस २४ मैल व दक्षिणेस: १०