पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२८) त्यांनी त्या वेळी वसईचा किल्ला जमीनदोस्त करून -टाकिला, व शत्रूच्या ४०० तोफा बरोबर घेऊन ते गोव्यांस परत गेले. गुजराथचा राजा सुलतान बहादूर किंवा बहादुरशाहा याला दक्षिण व माळवा या प्रांतांत मोठमोठे विजय प्राप्त झाल्यामुळे तो फारच चढून गेला होता. त्यामुळे दिल्लीचा बादशाहा हुमायून याची या वेळेच्या सुमारास त्याच्याशी चुरस लागली होती. तेव्हां पोर्तुगीज लोकांस आपल्या पक्षाकडे ओढून घ्यावे असे प्रत्येकास वाढू लागले. बहादुरशाहा याने पोर्तुगीज लोकांस आपणाकडे मिळविण्याकरितां इ० स० १५३३त त्यांना वसईप्रांत दिला, तांबड्या. समुद्राशी जो व्यापार चालत असे त्यावर जकात बसविण्याचा अधिकार त्यांस दिला, व त्याच्या राज्यांतील जी गलबतें व्यापाराकरितां बाहेर जातील त्यांनी प्रथम वसईच्या बंदरांत लागून पोर्तुगीज लोकांचा परवाना घेऊन नंतर पुढे जावें, असा बंदोबस्त करण्याचे कबूल केलें. इ० स० १५३४त हुमायून बादशाहाने पोर्तुगीज लोकांशी तहाचे बोलणे लाविले. परंतु त्यांनी बहादुरशाहाचा पक्ष सोडिला नाही. तेव्हां बहादुरशाहा मोठा खुश होऊन त्याने त्यांस दीव येथे किल्ला बांधण्याची परवानगी दिली. नंतर पोर्तुगीज लोकांनी पुनः वसई येथे आपली वखार घातली; परंतु वसईचा कांहींच बंदोबस्त त्यांनी केला नाही. इ०स० १५३६त मोंगलांचें सैन्य वसइवर चाल करून आले. परंतु पोर्तुगीज लोक मोठ्या तयारीने आहेत असे त्यांस आढळून येतांच एक बारही न काढतां ते लोक परत निघून गेले. त्या वेळी वसई येथे आंटोनिओ गालवाहो हा पोर्तुगीज सरदार होता. नंतर काही दिव