पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२७) प्रकारच्या स्वायऱ्यांचा, बंदोबस्त करण्याकरितां गुजराथचा राजा बहादुरशाहा यानें दीवचा सुभेदार मालिक टोकन यास वसईची तटबंदी करावी म्हणून हुकूम केला. तेव्हां टोकन याने तेथें एक लहानसा किल्ला बांधला, व समुद्र व खाडी या बाजूस तट घातला व त्याच्या सभोवार मोठा खंदक खणून तो खाया पाण्याने भरून टाकिला. त्याने वसईच्या संरक्षणाकरितां पायदळ व घोडेस्वार मिळून एकंदर १५००० लोक ठेविले. पुढे काही दिवसांनी पोर्तुगीज लोकांचा सरदार नूनो-डा कुन्हा हा बरोबर १५० लढाऊ जहाजे, २००० गोरे लोक, व २००० गोवेकरी घेऊन वसईच्या किल्ल्यावर चाल करून आला. त्या वेळी मालिक टोकन भिऊन गेला व त्याने त्याच्याशी तहाचे बोलणे सुरू केले. परंतु डा कुन्हा याने त्या वेळी ज्या अटी सांगितल्या त्या इतक्या कडक होत्या की, टोकन यास ते तहाचे बोलणे सोडून द्यावे लागले. नंतर पोर्तुगीज लोकांनी किल्ल्याच्या उत्तरेस थोडक्याच अंतरावर आपला तळ दिला. पुढे त्यांचे अघाडीचे सरदार डिआगो डी सिलव्हेरिया, व मान्यूएल डी मासीडो हे काही लोक बरोबर घेऊन शिड्या लावून तटावर चढले, व त्यानी टोकन याच्या फौजेवर अशा निकराने हल्ला केला की, त्याच्या फौजेस एकदम तेथून पळ काढावा लागला. त्या वेळी पोर्तुगीज लोकांस तेथे पुष्कळ धान्यसामग्री, व दारूगोळा सांपडला. पोर्तुगीज लोकांनी वसईच्याजवळच चौल येथे पूर्वी किल्ला बांधला होता. तेव्हां हा किल्ला राहू दिला तर त्यापासून आपणांस पुढे त्रास होईल असे त्यांस वाटून व तेथे ठेवण्या पुरती त्यांच्याजवळ शिबंदीही नव्हती म्हणून