पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२६) व्यापार चालत होता, तोपर्यंत वसई शहर विशेष प्रसिद्ध असेल असे वाटत नाही. ते सोपारच्या दक्षिणेस ६ मैलांवर आहे. इ०स० ११०० च्यापुढे त्याचे नांव थोडथोडे पुढे येऊ लागले. देवगिरीच्या यादव वंशाचे अमलाखाली (इ० स० १२०० - १२९०) वसई हे एका प्रांताचे मुख्य शहर असावे असा अंदाज आहे. परंतु इ०स० १५०७ पर्यंत त्या संबंधानें खातरीने असे काही सांगता येत नाही. गुजराथचा राजा महंमद बेगद (इ० स०१४६९-१५१३) याने इ० स० १५०७त वसई व मुंबई ही शहरे घेण्याचा प्रयत्न केला होता असे म्हणतात.इ०स०१५१४त बार्बोसा याने या शहरास बाक्से असे म्हटले आहे, व तेथें मूर व हिंदु लोक राहत असून ते गुजराथच्या राजांच्या अमलांतील एक उत्कृष्ट बंदर होते असें तो लिहितो. त्या वेळी तेथें व्यापाराची फार मोठी घडामोड होत असे. तसेंच निरनिराळ्या ठिकाणांहून तेथें गलबतें येत असत, व मलबाराहून सुपारी, नारळ, व दुसरे मसाल्याचे पदार्थ तेथे फार येत असत. इ० स० १५२६ त पोर्तुगीज लोकांनी प्रथमतः तेथे एक वखार घातली. गुजराथच्या राजास ती गोष्ट न आवडल्यामुळे त्याने त्यांस अतिशय त्रास दिला. तेव्हां इ०स० १५२९त हेक्टर डी सिलव्हेरिया हा पोर्तुगीज सरदार आपल्या २२ लढाऊ तारवांसह एके दिवशी रात्री वसईच्या बंदरांत शिरला, व एकाएकी शहरावर हल्ला करून त्याने अल्लीशाहा नांवाच्या सरदाराचा पराभव केला, व तें शहर जाळून टाकिलें. इ. स. १५३१ त पोर्तुगीज लोकांनी पुनः त्या शहराची अशीच नासाडी केली. पोर्तुगीज लोकांच्या अशा