पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२५) न ८० रुपयांची पडगी आहेत प्रमाणे आंत प व हज्जीअल्ली या दोन मुसलमान साधूंची थडगी आहेत. त्यांना सालीना सरकारांतून ८० रुपयांची नेमणूक आहे. त्याचप्रमाणे आंत एक अष्टकोनी चिरेबंदी तळे असून शिवाय पुष्कळ विहिरी आहेत. २३ वसईचा किल्ला.-वसई में शहर मुंबईच्या उत्तरेस ३० मैलांवर वसईच्या खाडीच्या उत्तरतीरावर आहे. हल्ली तेथें म्युनिसिपालिटी असून, ते तालुक्याचे ठाणे आहे. वसई-रोड स्टेशनापासून वसई शहर ४॥ मैलांवर आहे. पोर्तुगीज लोकांच्या नाश पावलेल्या इमारतींचे अवशेष भाग वसईच्या नैर्ऋत्य दिशेस असून ते ताडमाडांची गर्दी झाल्यामुळे त्यांत लपून गेले आहेत, व हा भाग व वसई शहर यांचेमध्ये गोखिाची खाडी आहे. ह्या भागाला पूर्वी वसई बेट असें म्हणत असत. वसईच्या किल्ल्याची साग्र माहिती समजण्याकरितां वसई शहराच्या प्राचीन इतिहासाची माहिती देणे अवश्य आहे. जोपर्यंत *सोपार हे कोकणप्रांताचें राजधानीचे शहर होते ( इ० स० ११०० पर्यंत) व तेथे फार मोठा _*हा फार मोठा गांव प्राचीन काळापासून म्हणजे इसवीसनापूर्वी १५००पासून इ०स० ११०० पर्यंत कोंकण प्रांताच्या राजधानीचें शहर होते. महाभारतांत याचे सुपारक असें नांव दिलेले आहे. पांडव गोकर्णाहन प्रभास तीर्थाला येत असतां ते येथे राहिले होते, अर्से लिहिले आहे. हरिवंशामध्ये याचें नांव आलेले आहे. गौतमबुद्धाने जे अनेक जन्म घेतले, त्यांपैकी एके वेळी तो सुपारक येथे जन्मला असा दाखला सांपडतो. इ.सं. पू. ५४० वर्षांच्या सुमारास बंगाल व मगध यांचेमधील प्रदेशाचा राजा विजय हा सुपारक येथे येऊन राहिला होता. सालोमनचे इ. स. पू. १००० वर्षे ओफीर म्हणून जें शहर होतें तेंच हे सोपार शहर असावें असें बेनफी म्हणतो,