पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२४) किल्ला आहे. त्याचे तटाचे काम वसईच्या किल्ल्यापेक्षाही ज्यास्त मजबूत आहे. इ० स० १५३० त पोर्तुगीज लोकांचा शिरकाव उत्तर-कोकणांत झाला. त्या वेळी हा किल्ला गुजराथच्या मुसलमान लोकांच्या ताब्यात होता. त्या वेळी किल्ल्यांत पुष्कळ घुमट व सारासन त-हेच्या पुष्कळ कमानी होत्या. पुढे तो पोर्तुगीज लोकांचे हाती आल्यावर त्यांनी त्या सर्व कमानी पाडून टाकल्या. पुढे पोर्तुगीज सरकारानें तो वसईच्या एका पोर्तुगीज गृहस्थाला देऊन टाकिला, व हल्ली जो किल्ला दृष्टीस पडतो तो त्या गृहस्थाने बांधलेला आहे. त्याने वर शिबंदी वगैरे ठेवून किल्ल्याचा नीट बंदोबस्त केला. इ० स०१७३७ त मराठ्यांनी तो पोर्तुगीज लोकांपासून घेतला. किल्ल्याच्या उत्तरेकडील दरवाज्यावर एक मराठी लेख्न आहे, त्यावरून हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांचे कारकीर्दीत शके १६५९ ह्मणजे इ० स० १७३७ त पुनः बांधला असे लिहिले आहे. इ० स० १७८१ त इंग्लिशांनी हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला व आगाशी येथून किल्ल्यावर तोफखाना सुरू करण्याचा विचार केला. परंतु किल्लेदाराने त्या वेळी तो इंग्लिशांस दिला नाही. हा किल्ला कायमचा असा इ० स० १८१७ त इंग्लिशांचे हाती आला. त्यानी तेथे काही दिवसपर्यंत थोडीशी शिबंदी ठेविली होती. हा किल्ला अद्यापि फार चांगल्या स्थितीत आहे. आंत गोडे पाणी पुष्कळ आहे. किल्ल्यांत त्रिंबकेश्वराचे व भवानीचें अशी दोन देवालय असून पहिल्याला ४५ रुपये व दुसन्यास ९१ रुपये अशी सरक रांतून सालीना नेमणूक आहे. तसेच आंत शाहाअली