पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२३) बांधलेल्या होत्या. त्यांपैकी बहुतेकांचा निकाल लागलेला आहे. त्यांची नांवें येणें प्रमाणेः-१ माहीमचा किल्ला, २ फुटका बुरूज, ३ मधला बुरूज, ४ अलीबागचा किल्ला, ५ पाणबुरूज, ६ दंडा किल्ला, ७ कितल, ८ टांकीचा बुरूज, ९ उसरणी, १० मथनें, ११ येदवण, १२ कोरें, १३ दातिवरें, १४ वरिठाण, १५ चटले, व १६ खटले. यापैकी शेवटच्या तीन अंतःप्रदेशांत होत्या. २१ दातिवऱ्याचा किल्ला. हा किल्ला माहीम तालुक्यांत माहीमच्या दक्षिणेस १० मैलांवर समुद्राकिनाऱ्यावर आहे. हा किल्ला पोर्तुगीज लोकांनी बांधला असावा. हल्ली त्याची सर्वत्र पडापड झालेली आहे. वसई तालुका. -:*:२२अरनाळा किल्ला (जंजिरा). हा किल्ला अरनाळा नांवाच्या एका लहानशा बेटाच्या वायव्य कोपऱ्यावर पाण्यांत बांधलेला आहे. उत्तर-कोकणांतील अतिशय मोठी नदी वैतरणा हिचे मुख या किल्ल्याचे मान्यांत आहे. इ० स० १८१८ त या किल्लचाचे असें वर्णन केलेले आहे की, तो लांबोळा असून त्याचे क्षेत्रफळ ७०० फूट आहे, व त्याला वाटोळे बुरूज आहेत. वरील भिंत धरून तटाची उंची साधारण ३० फूट आहे. तट भरीव असून नीट दुरुस्त होता. परंतु वरील काही ठिकाणी व विशेषतः बुरुजांजबळ पडापड झालेली होती. आंत कांही झाडे होती. उत्तर-कोकणांत वसईच्या खालोखाल असा हाच