पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२) फूट आहे. वरील भिंत धरून तटाची अतिशय उंची म्हटली म्हणजे सुमारे २८ फूट आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा पूर्वेच्या किंवा जमिनीच्या बाजूस आहे. किल्लयाच्या पश्चिम बाजूस खाडीचे पाणी येऊन लागते. बाकीच्या तीन बाजूंस बाहेरून दुसरी एक भिंत बांधलेली असून आंत शिबंदीची राहण्याची घरे आहेत गांव अगदी किल्ल्याला लागून आहे, व तेथे इतकी झाडी आहे की, किल्याच्या तटापर्यंत शत्रूला बिनबोभाट जातां येईल." इ० स० १८६२ त हा किल्ला फार चांगल्या स्थितीत होता. म्हणजे दमणच्या दक्षिणेस अरनाळा किल्ला शिवाय करून याच्या इतका बळकट किल्ला दुसरा नव्हता. हल्ली या किल्लयांत कलेक्टर साहेबाचा बंगला आहे. केळवे येथील किल्ला माहीमच्या किल्ल्याच्या दक्षिणेस दोन मैलांवर आहे. प्रथम दंडाराजपुरी खाडीच्या उत्तर तीरावर एक मेढेकोट बांधलेला आहे, व तेथून पश्चिमेचे बाजूस ८०० फुटांवर खाडीच्या तोंडाशी हा किल्ला बांधलेला आहे. इ० स० १८१८ त त्याची पहाणी केली त्या वेळी किल्ल्यांत पुष्कळ मोडकळीस आलेली घरे होती. खाडीच्या तोंडाशी दुसरा एक किल्ला आहे, त्याला पाणबुरूज असें म्हणतात. माहीमच्या उत्तरेस दोन मैलांवर शिरगांव व अरनाळ्याला लागूनच असणारा दातिवरे गांव या दोहोंच्या मध्ये सुमारे १५ मैलांची किनाऱ्याची पट्टी आहे. तेवढ्या अंतरांत चांचे लोकांपासून त्या किनाऱ्याला फार उपद्रव होत असे. तो बंद करण्याकरतां किल्ले व बुरूज मिळून एकंदर १६ तटबंदीच्या जागा पोर्तुगीज लोकांचे वेळी