पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१) आहे. त्या वेळी या किल्ल्यावर दारूगोळा व तोफा वगैरेचा फार बंदोबस्त होता, व तेथे एक पोर्तुगीज सरदार १० पोर्तुगीज शिपाई, एक नाईक, १ पोलीस इन्स्पेक्टर, ४ पोलीसचे शिपाई, १० काळे शिपाई, व : मशालजी इतके लोक होते. किल्ल्याला लागूनच गांव वसलेला होता, व तेथे ५० पोर्तुगीज कुटुंबें, १५० बाटे लोकांची कुटुंबें, व २०० हत्यारबंद गुलाम होते. गेमेली क्यारेरा याने माहीम गांव व किल्ला यांचा आपले लेखांत उल्लेख केलेला आहे. " हा किल्ला बळकट नसून त्याचा तट सखल आहे व तो दगड व चिखल यांनी बांधलेला आहे. त्याची लांबी ५५० फूट व रुंदी २२० फूट आहे, " असें इ० स० १७२८ त त्याचे वर्णन केलेले आहे. त्या वेळी वर ६० शिपाई लोक व पंधरा तोफा होत्या. किल्ल्यापासून काही अंतरावर एक मेढेकोट बांधलेला होता, व त्याच्या रक्षणार्थ एक कपतान व ३० शिपाई लोक ठेवलेले होते. इ० स० १७३९ तचिमणाजी आपाने मोठ्या शिकस्तीने हा किल्ला सर केला. " माहीमचा किल्ला त्रिकोणी आहे. त्याच्या तोंडाशी पंचकोनी दोन बुरूज असून तोफा व बंदुका मारतां याव्या म्हणून त्यांना भोंके ठेविलेली आहेत," असे इ० स० १७६० त त्याचे वर्णन केलेले आहे. माहीमचा किल्ला पूर्वी मोठा होता. परंतु खाडीच्या पाण्यामुळे हल्ली त्याचा बराच भाग वाहून गेलेला आहे. इ० स० १८१८ त माहीमच्या किल्ल्याची इंग्टिशांनी पाहणी केली, त्या वेळी तो फार चांगल्या स्थितीत होता. त्या वेळी त्याचें असें वर्णन केलेले आहे की, " हा किल्ला अतिशय बळकट असून त्याचे क्षेत्रफळ ८०