पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- (२०) कठिकाणी असा बंदोबस्त करून ठेविलेला होता. इ० स० १७२७त या किल्ल्याचे असें वर्णन केले आहे की,"वर सांगितलेली इमारत एका खडक वर बांधलेली असून तिची तटबंदीही फारशी उंच नाही. सारांश त्या जागेला. " किल्ला" असे म्हणता येणार नाही. आंत ८ तोफा व १०४ पहारेकरी लोक आहेत. आठ तोफांपैकी पांच तोफा निरुपयोगी आहेत." २० केळवेमाहीम येथील किल्ले.- केळे व मा. हीम हे दान निरनिराळे गांव आहेत. माहीम हा गांव माहीम तालुक्याचे मुख्य ठाणे असून तो पालघर रेलवे स्टेशनाच्या पश्चिमेस सुमारे पांच मैलांवर आहे. केळवे क माहीम यांच्यामध्ये खाडी असून केळवें माहीमच्या दक्षिण दिशेस सुमारे एक कोसावर आहे. वर सांगितलेल्या दोन्ही ठिकाणी दोन निरनिराळे किल्ले आहेत. केळवेमाहीमच्या संबंधाने असा इतिहास आढळून येतो की, तेराव्या शतकाच्या अखेरीस मुंबईमाहीम येथील सरदार भीमराव याने तो गांव मूळ नाईक लोकांच्या एका मुख्याच्या ताब्यात होता त्याच्यापासून घेतला. इ० स० १३५० च्या सुमारास तो मुसलमानांच्या ताब्यात गेला. इ० स० १ १ ० ० च्या सुमारास गुजराथच्या राजांकडे त्याचे स्वामित्व गेलें. इ० स० १५३२ च्या सुमारास पोर्तुगीज लोक त्याचे धनी झाले. इ० स० १६१२ त मोंगल लोकांनी त्या गांवावर हल्ला केला. परंतु पोर्तुगीज लोकांनी त्यांना दाद दिली नाही. " हा गांव डहाणू गांवाएवढा असून तेथे पुष्कळ फळबागा आहेत, व तेथचा किल्लाही डहाणू किल्ल्याप्रमाणेच आहे," असें इ० स० १६३४ त या गांवाचे वर्णन केलेले