पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९) पालघर रेलवे स्टेशनाच्या पूर्वेस १० मैलांवर आहे. वैतरणा नदीस समुद्राची भरती आली म्हणजे मानोरपर्यंत पाणी भरतें, व २० पासून ४० खंडी वजनाचें गलबत तेथपर्यंत येऊ शकते. पोर्तुगीज लोकांचे अमलांत मानोर हे एका परगण्याचे मुख्य ठिकाण होते. ठाणे प्रांताच्या उत्तर भागांत पोर्तुगीज लोकांचे जे किल्ले होते, त्यांत हा किल्ला व अशिरीचा किल्ला हे दोन मुख्य होते, असें वर्णन आढळते. परंतु त्यांत दिलेल्या हकीकतीवरून मानोरपासून जवळच असावचा किल्ला आहे, त्यालाच पूर्वी कदाचित् मानोरचा किल्ला म्हणत असतील असे वाटते. तथापि खुद्द मानोर येथे एका लहानशा उंचवट्याच्या प्रदेशावर एक फार जुनी इमारत असून तिचा आकार एखाद्या किल्ल्य प्रमाणे आहे. तेथे पाण्याचे एक टांके आहे. इ० स०१६३४त या इमारतीचें असें वर्णन केलेले आहे की, "ही इमारत दुमजली आहे. वरच्या मजल्याच्या छपराला खालून खांबांचा आधार दिलेला आहे. खालच्या मजल्याला दोन रस्ते असून त्यालाही खांबांचाच आधार दिलेला आहे. येथे शिसे, व बंदुकीच्या बारांची दारू यांचा साठा असे. तसेंच पांच तोफा, सत्तर बंदुका, तोफांचे गोळे व ३० मशाली इतकी सामग्री असे. या तटबंदी केलेल्या इमारतीला लागूनच एक सुमारे पाऊण मैल घेराचा मेढेकोट बांधलेला होता. या मेढेकोटाच्या मध्यंतरी एक बुरूज होता; व आंत २० पोर्तुगीज कुटुंबें, ७३ बाटे लोक, व ८० हिंदु व मुसलमान तिरंदाज लोक इतकी मंडळी असे." अहमदनगरच्या राजांपासून किंवा कोळी वगैरे लुटारू लोकांपासून त्या प्रांताला उपद्रव पोहोंचू नये म्हणून पोर्तुगीज लोकांनी उत्तर-कोकणांत ठि