पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१८) त रघुनाथराव ऊर्फ दादासाहेब पुण्याहून पळाला तो या किल्ल्यांत जाऊन राहिला. इ० स० १८०३ मध्ये हा किल्ला इंग्लिशांचे हाती आला. हा किल्ला पेशव्यांचे ताब्यांत होता, तेव्हां त्यांनी तो विकाजी मेहेरजी नांवाच्या मनुष्यास १०० वर्षांच्या मुदतीने इनाम म्हणून दिला होता, व तो अद्यापि त्याचे वंशजांकडे चालत आहे. तारापुरच्या उत्तरेस एक मैलावर खाडीच्या किनाऱ्यावर एक विटांचा बुरूज बांधलेला आहे. हल्ली त्याची पडापड झालेली आहे. इ० स० १८१८ त कॅपटन डिकिनसन याने त्या संबंधाने असे वर्णन केले आहे की, त्याची उंची २२ फूट असून त्याचा व्यास २८ फूट आहे. तोफा उडविण्याकरितां एक जागा (धमधमा ) केली होती ती जमिनीपासून नऊ फूट उंचीवर होती. तेथें पांच तोफा ठेविलेल्या होत्या. त्याच्यावर तशीच दुसरी एक जागा होती व तेथेही पांच तोफा ठेविलेल्या होत्या. तटाच्या वरच्या भिंतीची जाडी ३॥ फूट होती व त्याच्यावर छावणी होती. १८ दातिवरें किल्ला. हा किल्ला माहीमच्या दक्षिणेत १० मैलांवर आहे. हल्ली याची पडापड झालेली आहे. हा बहुधा पोर्तुगीज लोकांनी चांचे लोकांपासून आपल्या मुलखास उपद्रव होऊ नये म्हणून बांधला असावा. दातिवर येथे सुमारे शंभर प्रवाशांस उतरण्यास जागा मिळेल एवढी धर्मशाळा मुंबईच्या अरडेशीर दादी नांवाच्या पारशी गृहस्थाने बांधलेली आहे. ह्या किल्ल्याचे संबंधानें कांहींच माहिती मिळत नाही. १९ मानोरचा किल्ला.–मानोर हा गांव वैतरणा नदीच्या काठी अशिरगडाच्या दक्षिणेस ६ मैलांवर, व