पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७) दुभाषी, एक लेखक, एक मशालजी, व एक छत्रधारी इतके लोक होते. याशिवाय एक पाद्री, ५० पोर्तुगीज लोक, २०० बाटे लोक, व १०० गुलाम इतकी मंडळी असून ते सर्व युद्धकलानिपुण असून प्रत्येकाजवळ तरवार, भाला व बंदुक इतकी हत्यारे असत. इ० स० १७२८ त तारापूरच्या किल्ल्यावर फक्त ६० शिपाई होते असा दाखला सांपडतो. इ० स० १७३९ त चिमणाजी आपाने या किल्यावर हल्ला केला. किल्ल्याच्या तटाखाली ४ सुरंग खोदले होते. पैकी दोन सुरुंग चांगले लागू पडले व तटाला खिंडार पडलें. बाजी भिवराव, रामचंद्र हरी, यशवंतराव पवार हे मराठे सरदार आपापले लोक बरोबर घेऊन किल्ल्याकडे धांवले. परंतु पोर्तुगीज लोकांनी प्रथमतः त्यांचे काही चालू दिले नाही, व काही वेळपर्यंत जय कोणास मिळणार तें काहीच करेना. नंतर राणोजी शिंदे खंदकांत उतरला व ज्या ठिकाणी तटाला खिंडार पडले नव्हते अशा ठिकाणों तो आपल्या लोकांसह गेला. त्याचे लोक नागव्या तरवारी हातांत घेऊन तटाला शिड्या लावून वर चढले. परंतु ह्या ठिकाणीही पोर्तुगीज लोक मोठया निकराने लढले, व सर्वांचे देह धारातीर्थी ठेवीपर्यंत त्यांनी मराठ्यांच्या किल्लयांत शिरकाव होऊ दिला नाही. काही थोडे पोर्तुगीज लोक मराठ्यांचे हाती सांपडले, त्यांत किल्लेदार डॉन फ्रान्सिस डी आलारके ओ हा एक होता. ___ हा किल्ला मराठ्यांचे हाती आल्यावर त्यांनी समुद्राकडच्या तटाची भक्कम रीतीने दुरुस्ती केली. इ.स १७६० त ह्या किल्ल्याची स्थिति फार उत्तम होती, व वर एकंदर ४ तोफा होत्या, असा दाखला सांपडतो. इ०स०१७७६