पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोड असून मुबलक आहे." तारापुरची वस्ती हल्ली किल्लयापासून १५० फुटांच्या अंतरापर्यंत येऊन थडकली आहे. इ० स० १८६२ त त्याच्या उत्तरेकडील तटाचा काही भाग कोसळून पडल्यामुळे तो मोडकळीस आला होता. तारापूर हा गांव फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.इ.स.१२८० त माहीमचा राजा भीम याने नाईक लोकांपासून हा गांव घेतला. इ. स. १५३३ त पोर्तुगीज लोकांनी हा गांव जाळून टाकिला. इ. स. १५५६ त तारापूरच्या आसपास पोर्तुगीज लोकांस बराच मुलूख प्राप्त झाल्यामुळे सर्व दमण प्रांतांत तारापुरासारखे दुसरें भरभराटीचे ठिकाणच नव्हते. इ० स० १५५९ त कांहीं हबशी लोकांनी तारापुरावर हल्ला केला, परंतु पोर्तुगीज लोकांनी त्यांना पिटाळून लाविलें. इ. स. १५८२ त मोंगलांनी तारापूर घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फुकट गेला. इ.स. १५९३ त पोर्तुगीज लोकांनी तारापुरचा किल्ला बांधला. इ० स० १६१२ त मोंगलांनी तारापुरावर पुनः स्वारी केली, परंतु त्यांना विन्मुख परत यावे लागले. इ. स. १६३४ त तारापूर येथे एक न्यायाधीश असून त्याचा अमल दमण प्रांताच्या निमे भागावर चालत असे. तसेच त्या गांवाचा मुरत व दीव या बंदरांशी मोठा व्यापार चालत असे. तारापुरच्या कि. ल्याचा तट मोठा भक्कम असून त्याला सभोवार वाटोळे बुरूज होते. किल्ल्यांत शिपाई लोकांस राहण्याच्या कोठड्या असून शिवाय एक चर्च, एक ख्रिस्ती लोकांचा मठ, व एक दवाखाना होता. किल्लयाच्या शिबंदीमध्ये एक कपतान, एक नाईक, दहा शिपाई, एक पोलीस इन्स्पेक्टर, त्याचे हाताखाली चार शिपाई, एक