पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५) पूर्वी धान्य ठेवीत असत. आंत एक पाण्याचे टांके असून त्यांत सुमारे दीड पुरुष पाणी आहे. १७ तारापुरचा किल्ला.--(भुईकोट )-तारापूर हा गांव तारापुरच्या खाडीच्या दक्षिण तीरावर माहीमच्या उत्तरेस १५ मैलांवर आहे. येथे इ० स० १५९३ त पोर्तुगीज लोकांनी भुइकोट किल्ला बांधिला. इ० स० १८१८ त या किल्ल्याचे संबंधानें क्यापटन डिकिनसन याने असें वर्णन केले आहे की, " उत्तर-कोकणांत समुद्रकांठी जे किल्ले बांधलेले आहेत, त्यांत तारापुरचा किल्ला अतिशय मोठा असून तो फार चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्याच्या तटाचे दगड घडीव असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे ५०० फूट आहे. तटावरील पडदी शिवाय करून त्याची उंची ३० फूट, व जाडी १० फूट आहे, व पडदीची रुंदी ४ फूट आहे. उधानाचे पाणी आले म्हणजे ते किल्ल्याच्या उत्तरेकडील तटाला येऊन थडकते. काही काही ठिकाणी थोडथोडी पडापड झालेली आहे. पडदीच्या भिंतीचाही काही भाग पडलेला आहे. किल्ल्याच्या आग्नेयीकडील कोपऱ्यास बुरूज किंवा गोपुर वगैरे कांही नाही. त्याच्या तीन बाजूस साधारण खोल व रुंद असा खंदक आहे. परंतु तो कोरडा आहे. किल्लयांत जाण्याचा दुसरा दरवाजा पूर्वेकडील तटाच्या मध्यंतरी आहे. आंत पडापड झालेली पुष्कळ ठिकाणे व इमारती आहेत. याशिवाय पहारेकरी व शिबंदी लोकांची राहण्याची घरे आहेत; तसेंच आंत पुष्कळ विहिरी असून त्यांचे पाणी १ पौर्णिमा व अमावास्या या दिवसांचे सुमारास समुद्राचे भरतीचें पाणी फार वाढते त्यास उधानाचे पाणी असें म्हणतात.