पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४) कांच्या कांहीं झोपड्या होत्या. इ. स. १८६२ त किल्ल्याची तटबंदी पडून गेलेली होती. चोरटे लोकांस थारा मिळू नये म्हणून इंग्लिश सरकाराने आंतील पाण्याची टांकी फोडून टाकिली. १४ तांदुळवाडीचा किल्ला. हा किल्ला माहीमच्या आग्नेयीस १० मैलांवर एका १९०० फूट उंचीच्या टे. कडीवर बांधलेला आहे. किल्लयांत खडकांत खोदलेली पुष्कळ पाण्याची टांकी आहेत; तसेंच पूर्वी तेथे मोठी मजबूत तटबंदी असावी असे अनुमान होते. पूर्वेच्या बाजूस किल्ल्याचे पायथ्याशी वैतरणा नदी वाहत जाते, व तिच्या कांठी किल्ल्याला लागून लालठाण नांवाचे एक खेडे आहे. एथे पाण्याचा एक तलाव आहे, व तो पोर्तुगीज लोकांनी बांधला असे सांगतात. या किल्ल्याचे संबंधानें ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. १५ अलीबागचा किल्ला ( भुईकोट ). हा लहानसा किल्ला माहीमच्या दक्षिणेस ३ मैलांवर केळव्यांच्या खाडीच्या उत्तर तीरावर बांधलेला आहे. त्याच्या तटाची उंची वीस फूट असून त्याचे क्षेत्रफळ अवघे ५६ फूट आहे. आंत एक जुनी तोफ पडलेली आहे. हा किल्ला पोतुगीज लोकांनी बांधला असे सांगतात. १६ भवनगड. हा किल्ला केळवेमाहीमच्या दक्षिणेस ४ मैलांवर आहे. याची लांबी १८८ फूट व रुंदी ७० फूट आहे. हल्ली त्याची सर्वत्र पडापड झालेली आहे. याच्या सभोवार व आंत आंबे, फणस, व केळी या झाडांची गर्दी होऊन गेलेली आहे. आंत एक तळघर आहे, त्यांत