पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तारापूर वगैरे ठिकाणे घेतली त्याच वेळी शिरगांवचा किल्लाही सर केला. तो इ. स. १८१८ पर्यंत मराठ्यांकडे होता. पुढे त्याचे स्वामित्व इंग्लिशांकडे गेले. १२ काळदुर्ग.--हा किल्ला माहीमच्या ईशान्येस ८ मैलांवर वरकुते व नवली या खेड्यांत मोडतो. तो एका १९४७ फूट उंचीच्या टेकडीवर बांधलेला आहे. त्याची हल्ली पडापड झालेली आहे. इ. स. १८६२ त या किब्लयाची पाहणी झाली, त्या वेळी त्याची बहुतेक तटबंदी पडून गेलेली होती. परंतु. दरवडेखोर वगैरे लोकांस तेथें राहण्यास आश्रय मिळू नये म्हणून आंतील पाण्यची सर्व टांकी त्या वेळी सरकाराने फोडून टाकिली. या किल्लयाचे संबंधाने विशेष महत्त्वाची गोष्ट उपलब्ध नाही. १३ टकमकचा किल्ला.- हा किल्ला माहीमच्या आग्नेयीस पंधरा मैलांवर, तानसा व वैतारणा या नद्याच्या उगमाच्या काहीसा ईशान्यस जंगली प्रदेशांत एका २००० फूट उंचीच्या बिकट डोंगरावर बांधलेला आहे. कि. ल्लयाचा माथा ४०० याडे लांब व १०० याडे रुंद आहे. ह्या डोंगराची चढण दोन ठिकाणी साधारण सोपी आहे, व ह्याच ठिकाणी फक्त तटबंदी केलेली आहे. हा किल्ला स्वतःसिद्धच बळकट होता, तरी त्याची बरोबर डागडुजी व व्यवस्था नसल्यामुळे इ० स० १८१८ त तो इंग्लिशांस सर करण्यास मुळीच आयास पडला नाही. किल्लयाच्या पायथ्याशी इतकं दाट अरण्य आहे की, शत्र. चें सैन्य पायथ्याला येऊन भिडले तरी आंतील लोकांस त्याची मुळीच दाद लागणार नाही. किल्ल्यांत ९ टांकी होती व त्यांचे पाणी फार चांगले होते. तसेच आंत पहारेकरी लो.