पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लुक्यांतील डोंगर यांच्या नाक्यावर हा किल्ला बांधलेला आहे. पूर्वी अशिरी, माहीम, तारापूर, चिंचणी, डहाणू, शिरगांव इतक्या ठिकाणी याचा संबंध होता, त्यामुळे त्याला बरेच महत्त्व आले होते. किल्ल्याचे पायथ्याशी महागांव म्हणून एक भरवस्तीचा गांव आहे. या किल्ल्याचे संबंधाने ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. ११ शिरगांवचा किल्ला ( भुईकोट ). हा किल्ला माहीमच्या उत्तरेस तीन मैलांवर शिरगांव नांवाचे खेड्यांत समुद्रकिनाऱ्यावर आहे. ह्या किल्लयाचा आकार लांबोळा होता. त्याची लांबी २०० फूट व रुंदी १५० फूट होती. त्याच्या तटाची उंची ३० फूट व जाडी १० फूट होती. पूर्वी किल्लयांतील निमे जागा फक्त शिवं. दीच्या राहण्याच्या खोल्या, व धान्याची कोठारें यांनीच अडून गेलेली होती. अद्यापि हा घरां च्या भिंती जीव धरून आहेत. किलयांत एक गोड्या • पाण्याची विहीर आहे. पूर्वी किल्ला व गांव यांच्यामध्ये बरेच अंतर होते. इ. स. १८१८ त हा किल्ला इंग्लिशांचे हाती आला, तेव्हापासून शिरगांवचे खेडे व इतर झाडे उत्तर व पूर्व या बाजूंकडून वाढत वाढत किल्ल्याला येऊन भिडल्यामुळे किल्लयाच्या दरवाज्याशी येऊन पोहोंचेपर्यंत येथे किल्ला आहे असे समजून येत नाही. इ स. १८६२ त किल्ल्याचे फक्त पश्चिमेकडचे भिंताड अवशेष होते. भरतीचे वेळी पश्चिमेचे बाजूस समुद्राचे पाणी किल्लयांत शिरतें, पूर्वी किल्ल्याला लागून शिरगांव, शाळागृह होते. हल्ली रह. दारी बंगल्याकडे त्या शाळागृहाचा उपयोग केलेला आहे. इ. स. १७३९ त चिमणाजी आप्पाने कतलवाड, डहाणू,केळवे,