पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११) माथ्यावर एक अर्धा मैल लांबीरुंदीचे मैदान आहे, व तीन उ. त्कृष्ट पाण्याची तळी आहेत. तसेच किल्लयांतील पूर्वीच्या शिबंदीच्या राहण्याच्या काही झोपड्या आहेत. आंतील जमीन पुष्कळ ठिकाणी फार उत्तम आहे." इ० स० १८६२ त या किल्ल्याची सर्वत्र पडापड झालेली होती. इ०. स० १८८१ त याचे असें वर्णन केलेले आहे की, "किल्लयाचा आंतील दरवाजा पडून गेला आहे. किल्ल्याच्या पूर्वेस सुमारे १५० पावलांवर एका षट्कोनी बुरुजाच्या खाणाखुणा दृष्टीस पडतात. तेथे जवळच एक मोठा दगड असून त्यावर क्रुसाचे चिन्ह, व पोर्तुगीज लिपीने लिहिलेला एक लेख आहे. किल्ल्याच्या तटाच्या आंत २ व बाहेर ८ मिळून दहा हैाद आहेत. बाहेरच्या आठांपैकी दोन हौद कोरडे आहेत, बाकीच्यांतून पांच फुटांपर्यंत पाणी आहे. आंतल्या दोन हौदांपैकी एकाला पायऱ्या असून आंत ५ फूट पाणी आहे, व दुसऱ्याला पायऱ्या नसून आंत २॥ फूट पाणी आहे. शिवाय दोन टांकी आहेत. किल्लयाजवळ १५ मनुष्ये राहतील असे एक तळघर असून त्याला उजेड येण्याकरितां झरोके ठोवलेले आहेत." १० असावचा किल्ला.--हा किल्ला माहीम तालुक्यांत पालघर रेलवे स्टेशनाच्या ईशान्येस पांच मैलांवर एका ८०० फूट उंचीच्या टेकडीवर बांधलेला आहे. ही टेकडी सर्व बाजूंनी एकसारखी सरळ होत गेलेली आहे, व त्यांत तिची उत्तरेकडची बाजू तर फारच अवघड आहे. किल्याच्या खालचा काही भाग शिव य करून बाकी सर्व ठिकाणी य टेकडीवर दाट जंगल आहे. दक्षिणेस माहीम तालुक्यांतील डोंगरांची रांग, व उत्तरेस डहाणू ता