पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यल्लमा देवीचे देवालय आहे; तसेच पांच तळी आहेत. सर्वांत मोठ्या तळ्याचा परीघ ८२९५ फूट असून आंत ८-९ फूट झणजे सुमारे दोन पुरुष पाणी आहे. याच्या संबंधानें ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. ६ तेरडळचा किल्ला:-हे तेरडळ शहर बेळगांवच्या ईशान्येस ६० मैलांवर, व सांगलीच्या आनेयीस ४ १ मैलांवर आहे. या शहरापासून कृष्णेचा प्रवाह ४॥ मैलांवर आहे. हे तालुक्याचे ठाणे आहे. पूर्वी याच्या सभोंवार तट होता. येथील नेमीनाथ नांवाच्या देवळावरील शिलालेखांत ज्या किल्ल्याचा उल्लेख केलेला आहे, तो हाच किल्ला असावा. परंतु हल्ली जो तट अवशेष आहे, त्याला बंदुका मारण्याकरितां भोंके ठेविलेली आहेत, त्यावरून ह्या तटाची मागून बरेच वर्षांनी दुरुस्ती केलेली असावी. कारण वरील शिलालेख इ० स० ११२२ त लिहिलेला आहे; व त्या काळी बंदुकीच्या दारूची युक्ति निघालेली नव्हती. प्राचीन काळी तेरडळच्या पूर्वेकडील कोनांत एक किल्ला असून त्याला दुहेरी तट होता असे दिसून येते. त्याची बाहेरची भिंत हल्ली जमीनदोस्त झालेली आहे. तसेंच पूर्वी बाहेरचा तट व आंतला तट यांच्यामध्ये खंदक होता तोही हल्ली बुजून गेलेला आहे. आंतल्या तटाचा काही भाग अवशेष आहे. त्याचा पूर्वेकडील दरवाजा मात्र अद्यापि शाबूत आहे. याच्या दोन्ही बाजूस दोन बुरूज आहेत, व दोन्ही बाजूंनी आंतल्या तटाच्या भिंती त्याला आणून मिळविलेल्या आहेत. हा दरवाजा १२ फूट उंच व १० फूट रुंद आहे; व प्रत्येक बुरुजाची उंची ३० फूट व व्यास २६ फूट आहे. तटाची उंचीही सुमारे