पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त शिरहट्टी येथे सावनूरच्या नबाबांचा अमल सुरू झाला. इ. स.१७५६ त सावनूरच्या नबाबाने बाळाजी बाजीराव पेशव्यास जे ११ परगण दिले त्यांत शिरहट्टी हा परगणा होता. तेव्हांपासून देसाई हे इनामदार या नात्याने त्याची वहिवाट करूं लागले. इ. स. १७६४ त लक्ष्मेश्वर परगणा गोविंद हरी पटवर्धन यास पेशव्यांकडून सरंजामादाखल मिळाला, व इ. स. १८०१ साली पटवर्धनांच्या सरंजामाचे विभाग झाले, तेव्हां शिरहट्टीचा अधिकार चिंतामणराव सांगलीकर यांचेकडे आला. शिरहट्टी गदगच्या दक्षिणेस १२ मैलांवर सदर्न मराठा रेलवेवर आहे. ५श्रीमंतगड.-याला पूर्वी सीमांतगड असे म्हणत असत. हा किल्ला शिरहट्टीच्या दक्षिणेस १० मैलांवर आहे. हा किल्ला जरी सांगलीकरांचे हद्दीत आहे, तरी त्याचे स्वामित्व मिरजकरांकडे आहे. हा किल्ला सातारच्या राजांनी बांधला असे सांगतात. तटाची उंची ३० फूट व रुंदी ८ फूट आहे. तटावर पडभिंत असून तिला बंदुका मारण्याकरितां भोके ठेविलेली आहेत. हल्ली किल्लयांत बाभळीची झाडे व दुसरी कांटेरी झुडपें पुष्कळ आहेत. तसेच आंत विषारी जीवजंतुही पुष्कळ आहेत. या किल्याचा आकार वतुळखंडाच्या आकाराचा आहे. त्याला एकंदर ३० बुरूज आहेत. त्यांपैकी एक बुरूज फारच मोठा असून त्यावरून दक्षिणेच्या बाजूस पाहिले तर तुंगभद्रा नदीचा प्रवाह दृष्टीस पडतो. तुंगभद्रा नदी तेथून सुमारे १० मैलांवर आहे. तीस बुरुजांपैकी पूर्वेच्या बाजूचे सहा बुरूज इ. स. १८५८ त इंग्लिश सरकारच्या हुकुमावरून पाडून टाकलेले आहेत. बाकीचा सर्व भाग दुरुस्त आहे. आंत