पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७०) २५ फूट आहे. पूर्व दरवाजा, व पश्चिम दरवाजा यांच्यामध्ये ९२० फूट अंतर आहे. या दोन दरवाज्यांच्या बरोबर मध्य अंतरावर एका उंचवट्याच्या ठिकाणी एक बुरूज बांधलेला आहे. याची उंची ५० फूट, व व्यास ४२ फूट आहे. त्या बुरुजाजवळ हल्ली मामलेदार कचेरी आहे. या बुरुजावर एक मोठी तोफ पडलेली होती, परंतु इ० स० १८५८त इंग्रज सरकारच्या हुकुमावरून ती सांगली येथे आणून फोडून टाकिली. याशिवाय किल्लयाच्या इतर बुरुजांवरही दोन तीन तोफा होत्या. परंतु त्याही सांगलीस आणून फोडून टाकिल्या. पश्चिमेकडील दरवाज्याजवळचा तट बराच दुरुस्त आहे. या दरवाज्याच्या आंतले अंगास पहारेकरी लोकांकरितां कोठड्या केलेल्या आहेत. हल्ली उत्तरेकडील खोल्यांत गांवच्या पाटीलकुळकर्ण्याची कचेरी किंवा चावडी आहे, व दक्षिणेकडील कोठड्यांचा सावकारी तुरुंगाकडे उपयोग करितात. ह्या किल्लयाचे संबंधानें दुसरी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. ७ येलवट्टी किल्लाः—हा किल्ला शिरहट्टीच्या ईशान्येस ७ मैलांवर आहे. हा किल्ला इ. स. १८४६ त इस्ट इंडिया कंपनीने सांगली संस्थानचे अधिकारी चिंतामणराव पटवर्धन यांस इ. स. १८४४ त कोल्हापूर प्रांतांतील गडकरी लोकांनी जे बंड केले होते ते मोडण्यांत त्यांनी इंग्लिशांस मदत केली ह्मणून इनाम दिला. किल्लयाचे क्षेत्रफळ ६०० चौरस फूट आहे. त. टाला एकंदर १२ बुरूज आहेत. पडभिंत धरून प्रत्येक बुरुजाची उंची २५ फूट, व प्रत्येक बुरुजाचा व्यास ४०