पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६७) ळून येते, व दुसऱ्या एका आधारावरून तो लक्ष्मेश्वर येथीश अंकुशखान नामक पुरुषाने बांधला असे आढळते. त्याला १५ बुरूज आहेत. किल्ल्याचा तट चांगला मजबूत आहे. परंतु इ. स. १८५८ साली इंग्लिश सरकारच्या हुकुमावरून उत्तरेच्या बाजूच्या तटाचा काही भाग व तीन बुरूज जमीनदोस्त करून टाकलेले आहेत. तटाची उंची १९ फूट व रुंदी १५ फूट आहे. किल्लयाचा वीरभद्र नांवाचा बुरूज शिवाय करून बाकीचे बुरूज वाटोळे बांधलेले आहेत. वीरभद्र बुरुजाची रचना अष्टकोन असून तो शिकललेल्या दगडांनी बांधलेला आहे. किल्लयाचा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याच्या दोहों बाजूस दोन बुरुज आहेत, व त्या प्रत्येक बुरुजाची उंची ४० फूट व व्यास ३० फूट आहे. किल्ल्याच्या सभोवार खंदक असून तो ८०-१०० फूट रुंद व १२ फुट खोल आहे. शिरहट्टीचे देसाई यांना ही जहागीर कशी मिळाली याचे वर्णन मागील टीपत आलेच आहे. इ. स. १६८६ शब्द ऐकताच तिच्याजवळ तूप होतें तें दिव्यांत घालून तो दिवा तेवत ठेविला; व खेळ पुरा झाल्यावर तिने त्या जहागिरदारास त्याच्या वचनाचें स्मरण दिले. त्या वेळी त्याला आपला मूर्खपणा पूर्णपणे कळून आला. परंतु तो वचनाचा धड असल्यामुळे त्याने त्या बाईशी कांहीं शर्ती ठरवून सोमणणाचे नांवाने ती सर्व जहागीर करून दिली, व आपण मजलापूर नांवाच्या खेड्यांत जाऊन राहिला. सोमण्णास यापुढे खानगवंडे असें म्हणावें ही वरील शर्तीपैकी एक शर्त होती. असे सत्यप्रतिज्ञ पुरुष फारच विरळा. १ हा विजापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. विजापुरच्या अदिलशाही घराण्याच्या कारकीर्दीत तो सय्यद मासून बोखारी उर्फ अंकुशखान यास जहागिरी दाखल दिलेला होता.