पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किल्या. जुन्या शहराची रचना उंच जागेवर असल्यामुळ या किल्ल्यावर तेथून सहज मारा चालण्यासारखा आहे, त्यामुळे त्याला पूर्वीपासूनच फारसे महत्त्व नव्हते. किलयांत दिवाणखाना ह्यणून एक भव्य इमारत आहे. तेथे पूर्वी सांगलीकर राहत असत; व त्यांचा खजिनाही तेथेच असे. तसेंच सरकारी तुरुंग, धान्याच्या कोठया, लोहार व सुतार यांचे सरकारी कारखाने, मामलेदार व मुनसफ यांच्या कचेऱ्या वगैरे सर्व कारखाने किल्लयांतच असत. ४ शिरहट्टीचा किल्ला. हा किल्ला एका आधारावरून खानेगवंडे देसाई यांनी बांधला असें आढ १ हा शिरहट्टीच्या देसायांचा मूळपरुष, अंकुशखानाच्या पांचव्या पुरुषाने इ. स. १६०७ त लक्ष्मेवर प्रांत व शिरहट्टी गांव देसायांस इनाम दिला. यासंबंधाची अशी एक चमत्कारिक दंतकथा सांगतात की, हे देसाई मूळ निजामाच्या राज्यांत सगर व केंभावी म्हणून दोन गांव आहेत तेथे रहात असत. ते मूळ कुदवक्कल जातीचे होते. परंतु फकीरस्वामी म्हणून एका लिंगायत साधून त्यांस लिंगायत पंथाची दीक्षा दिली. या वंशापैकी अवलिंगवा नांवाची एक बाई भीमण्णा व सामण्णा अशा आपल्या पुत्रांस बरोबर घेऊन फकीरस्वामीबरोबर गदग प्रांतांत कडडी येथे येऊन राहिली. नंतर ती बाई सोमण्णास बरोबर घेऊन फकीरस्वामीबरोबर श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या यात्रेस निघाली. मार्गात एके दिवशी फकीरस्वामी त्या बाईसह अंकुशखान याचे वाडयांत एक रात्र उतरला. त्या रात्रीस तो जहागिरदार आपल्या पत्नीबरोबर बुद्धिबळ खेळत असतां इकडे डाव ऐन रंगांत येण्यास व दिव्यांतील तेल सरण्यास एकच गांठ पडली. त्याने दि. व्यांत तेल घालण्यास सांगितले. परंतु घरांत तेल नव्हते. त्या वेळी जर कोणी हा डाव पुरा होईपर्यंत हा दिवा जळत ठेवील तर मी त्याला आपली सर्व जहागीर इनाम देईन असें तो बोलला. वरील बाईने ते