पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १६९) __३ सांगलीचा किल्ला.-सांगली शहरांत हा किल्ला पाहण्यासारखा आहे. जुनें सांगली शहर व खण यांच्यामध्ये हा किल्ला आहे. तो अष्टकोनाकृति असून प्रत्येक बाह्य कोनाचे ठिकाणी वाटोळे बुरूज आहेत. त्याच्या सभोवती वाटोळा रुंद खंदक असून त्याची खोली सुमारे १३ फूट आहे. किल्ल्याचा तट १७ फूट उंच व १५ फूट रुंद आहे, व तो चुन्यांत दगड बसवून बांधलेला आहे. तटावर पूर्वी पडभिंत होती, परंतु हल्ली तिची पडापड झालेली आहे. पूर्वी किल्ल्याच्या सभोवार रेवणी ह्मणून दगड व चिखल मिळून एक भिंत घातलेली होती, व तिला बंदुका उडविण्याकरितां भोंकें ठेविलेली होती. परंतु हल्ली तिचा मागमूसही नाही असें मटले तरी चालेल; व हल्लींच्या बहुतेक सरकारी इमारती या भिंतीचे दगड लावूनच बांधलेल्या आहेत. किल्ल्यास उत्तरेचे बाजूस एकच दरवाजा आहे. परंतु इ० स० १८५७ साली त्याला आणखी एक भगदाड पाडून ठेविलें. आंत जाण्याचा पहिला दरवाजा २१ फूट उंचीच्या वाटोळ्या बुरुजांच्या मध्ये आहे. ह्या दरवाज्यांतून आंत गेलें म्हणजे दुसरा दरवाजा लागतो. हा पहिल्या दरवाज्यापेक्षां फारच मजबूत आहे. याच्याही दोन्ही बाजूस दोन मोठमोठे बुरूज असून त्याला बंदुका मारण्याकरितां तिरपी भोके ठेविलेली आहेत. याच्या आंत गेलें ह्मणजे रस्ता डाव्या हातास फुटतो. बुरुजांचे आंतले अंगास पहारेकऱ्यांच्या कोठड्या आहेत. इ० स० १८५० त हा किल्ला पाडून टाकिला, व वरील तोफा वगैरे काढून टा