पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६४) जात असतां वाटेने त्यास लागवड केलेली शेतें लागली. तेव्हां या परगण्याची जमाबंदी काय आहे, म्हणून त्याने प्रश्न केला. तेव्हां त्याचे सालीना एक लाख रुपये उत्पन्न सरकारपोत्यास जमा होते असे कळले. औरंगजेबास ती रक्कम फार थोडी वाटून त्याने पुढील साली(इ. स. १६९९)या परगण्याची जमाबंदी २ लाख करा, व त्याच्या पुढील साली म्हणजे इ० स० १७०० तत्याचा बसूल दोन लाख चाळीस हजार रुपये आलाच पाहिजे. असा हुकूम केला. हा जुलमी हुकूम ताबडतोब अमलांत आला, व त्याप्रमाणे इ० स० १७०० त त्या प्रांताचा वसूल २४०००० रुपये घेण्यात आला. तो वसूल इ० स० १७१६ पर्यंत तसाच जब. रीने घेत होते. पुढे सातारच्या शाहूमहाराजांचा तिकडे अमल बसल्यावर त्यांनी बहिरजी राजे पांढरे यास त्या परगण्यावर पाठवून दिले. त्या वेळी त्याला तो सर्व प्रांत ओसाड असा दृष्टीस पडला. बहुतेक ठिकाणी लोक घरेंदारे सोडून निघून गेले होते, व बहुतेक जमीन पडीत होती. पुढे त्याने प्रथम वर्षी १७१ रुपये चाहूरप्रमाणे सारा ठरवून सर्व जमिनीची लागवड केली (इ० स० १७१७), व त्याने तो सारा दरवर्षास दर चाहुरास १७३ रुपये प्रमाणे वाढवीत वाढवीत इ० स० १७२२ पर्यंत दर चाहुरास १०५ रुपयेपर्यंत वाढविला. इ० स० १७५० त मेघश्याम कृष्ण पटवर्धन त्या प्रांताच्या मामलतदारीचे काम पेशव्यांच्या तर्फेने पाहत असतां मंगळवेढे गोविंद हरी पटवर्धन यास सरंजामादाखल जो प्रांत मिळाला त्यांत मोडूं लागले. इ० स० १८०१ या साली पटवर्धनांच्या सरंजामाचे जेव्हां विभाग झाले तेव्हां मंगळवेढे सांगलीकरांचे वांट्यास आले.