पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होतें. इ० स० १४६० या साली दक्षिण-हिंदुस्तानांत फार मोठा दुष्काळ पडला होता. त्याला दामाजीपंताचा दुष्काळ असे म्हणतात. त्या वेळी मंगळवेढयाच्या वसुलाचे काम दामाजीपंताकडे असून धान्याने भरलेली पुष्कळ सरकारी पेंवें त्याच्या ताब्यांत होती. हजारों दुष्काळपीडित लोक मंगळवेढयास येऊ लागले. तेव्हां त्यांची ती भयंकर स्थिति पाहून त्या महात्म्यास त्यांची दया आली व त्याने ती सरकारी पेंवें खुली करून सर्व धान्य गरीब लोकांस वांटून दिले. बेदरच्या बादशाहास तें वर्तमान कळताच त्याने दामाजीस कैद करून हुजर आणण्याकरितां आपले लोक पाठवून दिले. ते दामाजीस पकडून घेऊन चालले असता त्याचे कुलदैवत पंढरपुरची पांडुरंगमूर्ति हिने महाराचे रूप धरून दामाजीस दरबारांत आणण्याचे पूर्वीच एकंदर खर्च झालेल्या धान्याच्या रकमेचा दरबारांत भरणा केला, व अशा रीतीने आपल्या भक्तास संकटांतून मुक्त केले. ह्या गोष्टीच्या सत्यतेबद्दल ज्याला जेवढा भाग खरा वाटेल तेवढाच त्याने घ्यावा. परंतु अशा प्रकारचे पुण्यपुरुष फारच विरळा. इ० स० १४८९च्या सुमा रास मंगळवेढे विजापूर सरकारच्या अमलाखाली गेलें, व इ. स. १६८६ त विजापुरचे राज्य लयास गेल्यावर ते मोंगलांचे ताब्यांत गेलें. औरंगजेब बादशाहा मंगळवेढ्याचे पूर्वेस ८ मैलांवर मसनूर गांवी छावणी देऊन बसला असतां (इ० स० १६९८-१७००) तो दररोज मंगळवेढे येथे पीर गैबी साहेब याच्या मशिदीच्या दर्शनाकरितां जात असे. या वेळची अशी एक चमत्कारिक गोष्ट सांगतात की, एके दिवशी औरंगजेब बादशाहा मंगळवेढ्यास