पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६२) चा खंदक ८२ फूट रुंद व ६३ फूट खोल आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा पूर्वबाजूस आहे. किल्लयांत चौबुरुजी नांवाचा बालेकिल्ला आहे. हा समभुज चौकोन आहे; व त्याची प्रत्येक बाजू २३० फूट लांब १८ फूट उंच, व ८ फूट रुंद आहे. त्याला रणमंडळ, रहाट, भूत, व बडेखान या नांवांचे चार बुरूज आहेत. या बुरुजांची उंची २५ फूट व प्रत्येकाचा व्यास ३० फूट आहे. चौबुरुजीला २ दरवाजे आहेत. एक पूर्वेच्या बाजूस तटाच्या बरोबर मध्यावर आहे, व दुसराही पश्चिमेच्या बाजूस तटाच्या मध्यावर आहे. ही चौबुरुजी शाहूमहाराज (थोरले ) यांच्या कारकीर्दीत (इ. स. १७०८ -१७४९) त्यांचे पदरचे पांढरे या आडनांवाचे सरदार मंगळवेढे परगण्याचा कारभार करीत असतां त्यांनी बांधला असे सांगतात. मंगळवेढे हा गांव सोलापुरच्या नैर्ऋत्येस ४२ मैल, पंढरपुरच्या दक्षिणेस १६ मैल, व सांगलीच्या ईशान्येस ६५ मैल आहे. स्कंदपुराणांत भीममहात्म्यांत मातुलिंगपुरी म्हणून ज्या शहराचे वर्णन केलेले आहे, तेच हे मंगळवेढे असावे असें पुष्कण विद्वान् लोकांचे मत आहे. अकराव्या शतकांत मंगळवेढे हे कल्लयाणच्या चालुक्य राजांच्या अमलाखाली असून ते एक फार नामांकित शहर असावे, व त्या ठिकाणी त्या राजांचा एक मोठा अधिकारी राहत असावा असे अनुमान होते. १४ व्या शतकांत तें बेदरच्या बाहामणी बादशाहांच्या अमलाखाली गेले. या बादशाहांच्या कारकीर्दीत दामाजीपंत नांवाच्या एका मनुष्यास मंगळवेढ्याच्या वसुलाचे काम सांगितलेले